भुसावळ – विविध स्थानकांवर गर्दी दर्शविणारे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत होत आहेत. काही बातम्यांमध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात मूव्हमेंट होत असल्याचा खोटा उल्लेखही करण्यात आला आहे. असे व्हीडिओ सामायिक शेअरिंग न करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी सांगितले.
कोविड-१९ च्या अशा आव्हानात्मक परिस्थितीत याविषयी कोणतीही तर्क, अनुमान करणे टाळावे.
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे तर्फे उन्हाळ्यात जास्त गाड्या चालविण्यात येतात आणि पुरेशी तिकीटे उपलब्ध असतात. प्रवाशांच्या सोयीसाठी कंफर्म तिकिटे असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात आली आहे.