नाशिक : घरात कुणी नसल्याची संधी साधत दिराने भावजयीवर बलात्कार केल्याची घटना गाडेकर मळा भागात घडली. याबाबत पीडितेने आपल्या सासूकडे आपबिती कथन केली असता तिनेही दमदाटी करीत वाच्यता केल्यास पतीपासून विभक्त करण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयीत दिरासह सासूवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिरास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. काशिफ सय्यद असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. गाडेकर मळयात राहणा-या पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ९ फेब्रुवारी रोजी पीडिता आपल्या घरात एकटी असतांना संशयीत दिर घरी आला. त्याने घरात कुणी नसल्याची संधी साधत दमदाटी करीत भावजयीस बळजबरीने बेडरूममध्ये नेवून बलात्कार केला. यानंतर पीडितेने आपल्या सासूकडे आपबिती कथन केली असता तिनेही या घटनेची वाच्यता करू नको नाही तर पती पासून विभक्त करू अशी धमकी दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.
…
७५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र दुचाकीस्वारांनी ओरबडले
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सुमारे ७५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना पखालरोड भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना अतुल अन्नदाते (रा.खोडेनगर,पखालरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अन्नदाते या शुक्रवारी (दि.९) रात्री जेवण आटोपून परिसरात फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. आयप्पा मंदिराजवळून त्या पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळय़ातील सुमारे ७५ हजार रूपये किमतीचे
.