नाशिक – इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये सहभागी झालेल्या नाशिक स्मार्ट सिटीने सहभाग घेतला आङे. याअंतर्गत शहरातील सायकल संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले.
त्याचा निष्कर्ष असा
प्रश्न:- सायकल चालवता येते का?
उत्तर:- 92 टक्के पुरूष व 59 टक्के महिलांचे होय असे उत्तर आलेले आहे.
प्रश्न:- सायकलचा वापर कसा करता?
उत्तर:- 66.1 टक्के नागरिक दररोज सायकल चालवता. 15.1 टक्के नागरिक फक्त आठवड्यातून एकदा सायकल चालवतात.
प्रश्न:- सायकल का चालवता?
उत्तर:- कामावर व व्यायामासाठी सायकल वापरण्याची पुरूषांची संख्या जास्त आहे. तर, महिला हौस आणि व्यायामासाठी सायकल चालवतात.
प्रश्न:- सायकल चालवताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात?
उत्तर:- नागरिकांना सायकल चालवताना येणाऱ्या अडचणी पुढील प्रमाणे –
• भरधाव वाहनांची भिती – 65.6 टक्के महिलांना सायकल चालवताना भरधाव वाहनांची भिती वाटते.
• खड्डे व उघडी गटारं यांची भिती – 47.6 टक्के पुरूष व महिलांना सायकल चालवताना खड्डे व उघड्या गाटारांमुळे अपघात होण्याची भिती वाटते.
• बेशिस्त पार्किंग व पायी चालणारे नागरिक – 50.5 टक्के महिला व पुरुषांना बेशिस्त पार्किंग म्हणजे रस्त्यावर कशाही प्रकारे पार्क केलेल्या गाड्या, पायी चालणारे नागरिक यांची सायकल चालवताना भिती वाटते.
• वाहतूक कोंडी- 41.1 टक्के नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे सायकल चालवण्यास भिती वाटते.
• सायकल चालवणे कुठे असुरक्षित वाटते?- मुख्य रस्ता, अरूंद रस्ता आणि चौफुलीवर सायकल चालवणं असुरक्षित वाटत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
प्रश्न:- सायकल चालवणे सुरक्षित असेल तर सायकल चालवाल का?
उत्तर:- सुरक्षित सायकल ट्रॅक व सायकलिंगसाठी पायाभूत सुविधा असतील तर सायकल नक्कीच चालवणार असं 96 टक्के पुरूष व 94.9 टक्के महिलांचं म्हणणं आहे.