नाशिक – शहर पोलिसांच्या परिमंडळ २ कार्यक्षेत्रातील आठ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेला डोकेदुखी ठरणाऱ्या गुन्हेगारांचा त्यात समावेश असून ही कारवाई उपायुक्त विजय खरात यांनी केली आहे.
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सतिश बबन माने (२३ रा.माऊलीचौक,दत्तनगर अंबड),राजू उर्फ राजेश कचरू अढांगळे (३१ रा.इंदिरागांधी वसाहत १,लेखानगर),अजय संजय आठवले (२५) व अक्षय संजय आठवले (१९ रा.दोघे शनी मंदिराजवळ,शिवाजी चौक,सिडको) तर नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील हुसैन फिरोज शेख (१८ रा.रेल्वे कॉलनी,सिन्नर फाटा) व गणेश उर्फ छकुल्या मधुकर वाघमारे (१९ रा.खंडू गायकवाड मळा,एकलहरे रोड) तर उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील पराग उर्फ गोट्या राजेंद्र गायधनी (२७ रा.गायधनी निवास,पुरूषोत्तम स्कूल जवळ,नाशिकरोड) तसेच सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील अजय महादू मोरे (२६ रा. शगून रो हाऊस,प्रगती शाळेजवळ अशोकनगर) अशी संशयीत तडिपारांची नावे आहेत. शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत संशयीतांविरोधात गंभीर गुन्हे दाखल असून, नागरीकांच्या जीवीताचे तसेच मालमत्तेच्या संरक्षणार्थ तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहवी आणि संशयीतांच्या वर्तनात सुधारणा व्हावी या हेतून पोलीस आयुक्त दीपक पाण्डये यांच्या मार्गदर्शनाखाली ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून त्यांना शहर आणि जिल्हाबाहेर हलविण्यात आले आहे.