नवी दिल्ली – न्यूझीलंडनं मंगळवारी ग्लेन फिलिप्सच्या नाबाद अर्धशतक आणि डेरियल मिचेलच्या फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशला २८ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका आपल्या नावावर केली आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडनं १७.५ षटकात ५ गडी गमावून १७३ धावा करून बांगलादेशसमोर मोठं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशचा संघ निर्धारित १६ षटकात सात गडी गमावून १४२ धावाच करू शकला. या सामन्यात बांगलादेशच्या डावादरम्यान फिलिप्सनं झेल घेण्यासाठी अफलातून सूर मारला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
बांगलादेशच्या डावात नवव्या षटकात मोहम्मद नईमनं लेग स्पिनर ईश सोढीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू खूपच उंच गेल्यानं सीमापार जाऊ शकला नाही. त्यादरम्यान क्षेत्ररक्षण करणार्या ग्लेन फिलिप्सनं धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्या हातातून निसटल्यानं फलंदाज बाद होऊ शकला नाही. त्याचा झेल घेण्याचा अंदाज खूपच अफलातून होता. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं.
या सामन्यात न्यूझीलंडनं चांगली सुरुवात केली. सहा षटकांच्या पहिल्या पावर प्लेमध्ये दोन गडी बाद करून ५५ धावा केल्या. त्यानंतर त्यांचे फलंदाज ठराविक अंतरात बाद होत गेले. ९४ धावांवर ४ गडी गमावून मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन फिलिप्स मैदानात उतरला आणि न्यूझीलंडचा डाव सावरला. त्यानंतर १३ व्या षटकात पाऊस आल्यानं न्यूझीलंडचा डाव दोन षटक आणि एक चेंडू कमी करण्यात आला. त्यांना फलंदाजीसाठी १७.५ षटकंच देण्यात आली.
What the heck ??
such a stunner from Glenn philips#NZvsBAN pic.twitter.com/CPyR9WkcsD— Miraclewoods (@itsmiraclewoods) March 31, 2021