नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यात नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे. नाशिकबरोबर नागपूरच्या मेट्रोचाही त्यांनी उल्लेख केला. नाशिकच्या या घोषणेमुळे मेट्रोचे नाशिकचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या घोषणेचे नाशिकमध्ये स्वागत करण्यात आले आहे.
सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि बस व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १८ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी तर नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश आहे.
पहिल्यांदाच अर्थसंकल्प केवळ डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाला आहे. अँड्रॉईड आणि आय ओ एस प्लॅटफॉर्म्स वर युनियन बजेट या मोबाइल अॅपवरही अर्थसंकल्प बघितला जात आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात अनेक विध घोषणा होण्याची चिन्हे केली जात आहे. कृषी, उद्योग, आरोग्य, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरघोस तरतूदीत यात आहे. विविध क्षेत्रांना आणि खासकरुन लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना या अर्थसंकल्पाकडून घोषणा होत आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना व योजना अर्थसंकल्पात आहे.