भारतीय वैद्यकीय परिषदेचा निर्णय
हर्षल भट, नाशिक
मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत साथीचे आजार आल्यावर सामोरे जाण्याचे तंत्रशुद्ध शिक्षण दिले जाणार आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेने ‘महामारीचे व्यवस्थापन’ हा विषय एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. साथीच्या आजारांचे थैमान अनेक वर्षांपासून सुरु असून त्याला समोरे जाण्यासाठी वैद्यकीय शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याची माहिती होणे अनिवार्य असल्याने भारतीय वैद्यकीय परिषदेने महामारीचे व्यवस्थापन हा विषय अंतर्भूत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.साथीचे आजार आल्यावर त्याला सामोरे कसे जायचे याचं तंत्रशुद्ध, सखोल असे शास्त्रीय शिक्षण आतापर्यंतच्या एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला नव्हता. मात्र यापुढे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना महामारीचे धडे मिळणार आहेत. मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रम शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत पीपीई किटच्या वापरापासून ते महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थापन कशा पद्धतीने हाताळावे याविषयी शिक्षण दिले जाणार आहे. तसेच फक्त या आजारांवर उपचार न करता सामाजिक व कायदेशीर पद्धतीने हाताळण्यासाठी विद्यार्थी घडवण्याकडे भर दिला जाणार आहे. बोर्ड ऑफ गव्हर्नर्स अर्थात भारतीय वैद्यकीय परिषदेने ‘महामारीचे व्यवस्थापन’ हा विषय ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून यापुढे कोरोनासारखे संकट आल्यास सक्षम विद्यार्थी तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य साथीच्या आजारात काय करावे याचा अभाव असल्याने सखोल वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. केवळ साथरोग आणि औषधवैद्यक शास्त्र विभागातील तज्ज्ञ यांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला होता. विद्यार्थी दशेतच साथीच्या रोगा संबंधी सर्व गोष्टीचे ज्ञान अवगत होण्याच्या दृष्टीने हा सखोल अभ्यासक्रम बनवण्याचा निर्णय बोर्ड ऑफ गव्हर्नर्स-भारतीय वैद्यकीय परिषदेने घेतला आहे. याकरता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या १२ तज्ज्ञांनी अभ्यासक्रम बनवला असून यापुढे तो ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे.
संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना, पीपीई किटचा योग्य वापर करण्याची पद्धत, टेस्टिंग करतेवेळी चाचण्यांचे नमुने घ्यावयाची पद्धत, त्यांचे योग्य संकलन आदी अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. उपचारपद्धती हाताळण्याची प्रणाली, साथीच्या आजाराचे व्यवस्थापन व त्याचे विलगीकरण, अलगीकरण तसेच कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग इत्यादी सर्व विषयांवरील अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. प्रामुख्याने या अभ्यासक्रमात चिकित्सालयीन औषधशास्र, सूक्ष्मजीवशास्र, जनऔषध वैद्यकशास्र, श्वसनविकार यासंबंधी शिक्षक व विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.