इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एका विवाहित महिलेला तिच्या पतीने बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर तीन हॅाटेलच्या छतावरुन उडी घेतल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. ही घटना सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैदी झाली त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या घटनेत पोलीस पोहोचण्यापूर्वीच विवाहित महिलेने फिल्मी स्टाईलने थेट हॉटेलच्या छतावरून उडी मारली आणि पळून गेली. लोकांनी तिच्या बॉयफ्रेंडला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं.
बरौत शहरातील छपरौली रोडवरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. महिला तिचा बॉयफ्रेंड शोभितसोबत हॉटेलमध्ये आली होती पण त्यानंतर तिचा पती आणि तिच्या सासरचे इतर सदस्य तिथे पोहोचले. महिला तिच्या पतीला पाहून घाबरली आणि हॉटेलच्या १२ फूट उंच छतावरून उडी मारून पळून गेली. या महिलेचे पतीसोबत वारंवार वाद होत होत असल्याचे बोलले जात आहे.