रायपूर – छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाल्याचे सांगण्यात आले. पण केवळ 21 जवानांचे पार्थिव हाती लागले. सीआरपीएफ कोब्रा बटालीयनचे एक जवान राकेश्वर सिंग मनहास बेपत्ता होते. सोमवारी नक्षलवाद्यांनी काही स्थानिक पत्रकारांना फोन करून राकेश्वर सिंह आपल्या ताब्यात असल्याची माहिती दिली. त्याचवेळी जवानाला कुठलीही इजा पोहोचविणार नाही, याची हमीही त्यांनी दिली.
ज्या ठिकाणी नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली तेथूनच थोड्या अंतरावर असलेल्या एका गावात या जवानाला ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी आसपासच्या परिसरात नक्षलवाद्यांचाही ठिय्या आहे. यादरम्यान जवानाची पाच वर्षांची कन्या राघवी हिने आपल्या वडिलांना सोडा, असे आवाहन नक्षलवाद्यांना केले आहे. ‘पापा की परी पापा को बहुत मिस कर रही है. मैं अपने पापा से बहुत प्यार करती हूं. प्लीज मेरे पापा को घर भेज दो‘ असे भावनिक आवाहन राघवीने केले आहे. जवानाची पत्नी मीनू हिनेही आपल्या नवऱ्याला सोडून देण्याचे आवाहन नक्षलवाद्यांना केले आहे. राकेश्वर सिंह हे जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत. त्यांचे पोस्टींग बिजापूर जिल्ह्यात आहे. सोमवारी नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातील काही पत्रकारांना फोनवर संपर्क केला आणि बेपत्ता असलेला जवान आपल्या ताब्यात असल्याची माहिती दिली. जवान पूर्णपणे सुरक्षित असून लवकरच त्यांना सोडून देऊ, असेही त्यांनी म्हटले. आपरेशन प्रहारमध्ये सामील होऊ नका, असे आवाहनही नक्षलवाद्यांनी जवानांना केले आहे. पत्रकारांना फोन आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस प्रशान अलर्ट झाले असून जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
राकेश्वर सिंह गावात दिसले होते
फायरिंगच्या दरम्यान राकेश्वर सिंगजवळचे काडतूस संपले होते. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी डोंगराजवळ ते लपले होते. फायरिंग थांबल्यावर रायफल घेऊन ते निघाले मात्र रस्ता विसरले. अश्यात एका गावाच्या दिशेने ते निघाले. गावाच्या अगदी जवळ असतानाच गावकऱ्यांच्या वेषात असलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांना रोखले आणि रायफल ताब्यात घेतली.
आई, पत्नी चिंताग्रस्त
राकेश्वर सिंहची आई आणि पत्नी जम्मूमध्ये असून अपहरणाची माहिती मिळताच त्यांची चिंता वाढली आहे. पत्नी मीनू यांनी पत्रकारांच्या माध्यमातून नक्षलवाद्यांना आवाहन केले.
#Bijapur #NaxalAttack में बंधक बनाए गए जवान की बेटी की आवाज़ सुनकर मन भावुक हो गया.
परिवार के दर्द की हम सिर्फ कल्पना ही कर सकते हैं…
उनकी सुरक्षित वापसी के लिए हर संभव प्रयास किये जा रहे हैं. आपके पिताजी रक बहादुर योद्धा हैं बिटिया. आप भी उनकी तरह धैर्य और हिम्मत से काम लें… pic.twitter.com/8dwTw5xkj3— Dipanshu Kabra (@ipskabra) April 5, 2021