बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हो, रेल्वे भरतीची ती जाहीरात बेकायदेशीर

by India Darpan
ऑगस्ट 10, 2020 | 1:34 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
ZoQ3rXKw 400x400

नवी दिल्ली – भारतीय रेल्वेच्या आठ श्रेणींतील भरतीसंदर्भात खासगी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीविषयी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.  रेल्वेच्या कोणत्याही नोकरभरतीसंदर्भातील जाहिरात नेहमी रेल्वेकडूनच प्रसिद्ध केली जाते. कोणत्याही खासगी संस्थेला हा अधिकार नाही. त्यामुळे ही जाहिरात देणे बेकायदेशीर आहे, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, भारतीय रेल्वेच्या लक्षात आले आहे की, ““अव्हेस्ट्रेन इन्फोटेक” नावाची संस्था, जिचे संकेतस्थळ www.avestran.in  आहे, या संस्थेने ८ ऑगस्ट रोजी एका प्रमुख दैनिकात जाहीरात प्रसिद्ध केली आहे. रेल्वेतील ५२८५ जागांसाठी ११ वर्षांच्या कंत्राटावर नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जदाराला ७५० रुपये ऑनलाईन शुल्क भरावयास सांगण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर आहे. यासंदर्भात, असेही स्पष्ट करण्यात येते की, रेल्वेच्या गट ‘सी’ आणि ‘डी’ गटाची भरती रेल्वेच्या २१ रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) आणि १६ रेल्वे भरती कक्ष (आरआरसी) यांच्याकडून केली जाते, कोणत्याही खासगी संस्थेकडून नाही. भारतीय रेल्वेतील नोकरभरतीला केंद्रकृत रोजगार समाचारच्या माध्यमातून सर्वदूर प्रसिद्धी दिली जाते, असेही रेल्वेने सांगितले आहे.

चौकशी सुरू; कारवाई होणार

देशभरातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जातात. एम्प्लॉयमेंट न्यूज/रोजगार समाचारच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीसंदर्भात राष्ट्रीय वर्तमानपत्रे आणि स्थानिक वर्तमानपत्रांना सूचक सूचना दिली जाते. तसेच जाहिरात आरआरबी/आरआरसीच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाते. आरआरबी/आरआरसीच्या संकेतस्थळाचा उल्लेख जाहिरातीत नमूद असतो. पुढे आणखी स्पष्ट करण्यात येते की, रेल्वेने भरतीसंदर्भात कोणत्याही खासगी संस्थेला अधिकार दिले नाहीत, जसे वर नमुद केलेल्या जाहिरातीत नमूद केले आहे. रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या संस्था/व्यक्तींविरूद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कृषी उद्योग व स्टार्टअपसाठी १ लाख कोटी; पंतप्रधानांची घोषणा

Next Post

भारताने एका दिवसात ७ लाखाहून अधिक चाचण्यांचा गाठला नवा उच्चांक

India Darpan

Next Post
Corona Virus 2 1 350x250 1

भारताने एका दिवसात ७ लाखाहून अधिक चाचण्यांचा गाठला नवा उच्चांक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011