India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हरणबारी व केळझरचे पूरपाणी कालव्याद्वारे सोडा; माजी आमदार दिपिका चव्हाण यांची मागणी

India Darpan by India Darpan
August 25, 2020
in स्थानिक बातम्या
0

सटाणा – हरणबारी व केळझर धरणातून पुरपाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर आरम व मोसम नदीपात्रात सुरु आहे. सदरचे पूरपाणी हे कालव्याद्वारे सोडले तर शेतशिवारातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. त्याचा बागायत शेतीला फायदा होणार आहे. त्यामुळे सदरचे पूरपाणी हे कालव्याद्वारे सोडण्याची मागणी माजी आमदार दिपिका चव्हाण यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
चव्हाण यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सद्यस्थितीत केळझर मधून १९८ तर हरणबारी धरणातुन ५२३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग आरम व मोसम नदीपात्रात सुरु आहे. यातील काही पाणी हे केळझर डाव्या कालव्याद्वारे तर हरणबारी धरणाचे पूरपाणी हे हरणबारी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोडले तर पाण्याच्या पातळीचा समतोल राखता येईल.  बागायत क्षेत्राला याचा उन्हाळ्यात फायदा होईल. अशा पद्धतीने नियोजन पाटबंधारे विभागाने करावे, असे पत्रात म्हटले आहे.
हरणबारीचे पाणी तळवाडे, भामेर पोहोच कालव्यापर्यंत सोडण्यात यावे. तर केळझरचे पुरपाणी चारी क्र ८ द्वारे हे पूरपाणी सोडण्यात येऊन पाटस्थळवर असलेले बंधारे भरण्यात यावेत. जेणेकरुन उन्हाळ्यात बागायत क्षेत्राला पाणी टंचाई जाणवणार नाही. केळझरच्या डाव्या कालव्यावर डांगसौंदाणे, कऱ्हाळेपाड़ा, भिलदर, किकवारी, वटार, विरगाव, वनोली डोंगरेज आदी गावांच्या रब्बीचा पाणी प्रश्न सोडविता येतो. तर हरणबारी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे मोसम खोऱ्यातील असंख्य गावांचा रब्बीचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होते, असे चव्हाण यांनी सांगितले आहे.

Previous Post

बेरोजगारांना रोजगाराची संधी; उद्यापासून अर्ज प्रक्रिया

Next Post

चांदवडला रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

चांदवडला रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खासदार उदयनराजे संतापले आणि करुन टाकली ही मोठी घोषणा…

March 27, 2023

सुवर्णपदक विजेत्या लोव्हलिना बोरगोहेन अशी बनली बॉक्सर… या एका घटनेने दिली कलाटणी…

March 27, 2023

महागावच्या शेतकऱ्यांच्या गटाची यशोगाथा… सर्व सभासदांना असे केले स्वावलंबी….

March 27, 2023

तरुणांनो, लागा तयारीला! पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल १६ हजार पदांसाठी भरती; येथे करा अर्ज

March 27, 2023

CBIने सापळा रचला… ५ लाखाची लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले… मग अधिकाऱ्याने…

March 27, 2023

अभिनेत्रीने या वयात कुटुंबाला दिली ‘गुडन्यूज’

March 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group