बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सीटूचे ‘भारत बचाव, जनता बचाव’ आंदोलन

by Gautam Sancheti
ऑगस्ट 8, 2020 | 11:28 am
in इतर
0
1172

आयकर लागू नसलेल्या कुटुंबांना ७५०० रुपये मदत देण्याची मागणी
नाशिक – कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या निर्णयानुसार ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला सीटूच्या वतीने आज (८ ऑगस्ट) नाशिक जिल्ह्यात २५ ठिकाणी भारत बचाव/जनता बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये सिटू संलग्न विविध कामगार संघटनांच्या १४०० कामगारांनी सहभाग घेतला.
मोदी सरकारच्या कामगार विरोधी-जनविरोधी व देशविरोधी धोरणाच्या विरोधात कामगार संघटनानी ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने भारत बचाव आंदोलनाची हाक दिली आहे. मोदी सरकारच्या धोरणामुळे कामगार, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक सर्वांची वाताहत झाली आहे. बेरोजगारांना काम नाही, काम करूनही वेतन मिळत नाही. कामगार कपात केली जात आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना जगण्यासाठी केंद्र सरकारने कुठलेही प्रकारचे आर्थिक मदत केलेली नाही. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलासा दिला पाहिजे. आयकर लागू नसलेल्या कुटुंबांना ७ हजार ५०० रुपये आर्थिक मदत, दर माणशी १० किलो धान्य देण्याची मागणी आंदोलनाच्या वेळी करण्यात आली. त्याचबरोबर कामगार कायदात केलेले कामगार विरोधी बदल रद्द करावेत. वेतन कपात व कामगार कपाती वर बंदी आणावी अशी मागणी केली.
सर्व स्तरावरील परीक्षा रद्द कराव्यात व ऑनलाईन शिक्षणाचा निर्णय मागे घ्यावा. अंगणवाडी, आशा, शालेय पोषण कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन द्यावे. शेतमजूर, ऊसतोडणी, यंत्रमाग, रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर, हॉकर्स इ. असंघटितांसाठी कल्याणकारी मंडळांची स्थापना करा. इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी सिटूचे झेंडे व मागण्यांचे फलक हातामध्ये घेऊन घोषणा दिल्या. राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड, जिल्हा अध्यक्ष सिताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे, सिंधू शार्दुल, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, दिनेश सातभाई,गोपाल जायभावे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
येथे झाले आंदोलन
पाथर्डी गावाच्या सर्कल जवळ अल्फ कंपनीतील कामगार तसेच गॅलॅक्सी कंपनीचे काही कामगार उपस्थित राहून घोषणा देत केन्द्र व राज्य सरकार विरोधी निदर्शने करण्यात आले. नोवातीयार इले. व डि. सि. प्रा. लि. अंबड (Legrand) नाशिक कंपनीतील कामगारांनी विजय नगर स्टॉप येथे आंदोलन केले. सुदाल इंडस्ट्रीज लि अंबड येथील कामगार त्रिमूर्ती चौक येथे केंद्र व राज्य सरकार विरोधी निदर्शने करण्यात आले. लुसी ईलेक्ट्रिकल्  व अल्फ इंजी. कंपनीतील कमगार केंद्र सरकार विरुद्ध निदर्शने करतांना ५५ ते ६० कामगार उपस्थित होते. फिफानर  इन्स्ट्रुमेंट प्रायव्हेट लिमिटेड सारूळ विल्होळी. त्रिमुर्ती चौक, दत्त मंदिर स्टॉप पेट्रोल पंपासमोर  केंद्र सरकार विरुद्ध निदर्शन करण्यात आले. ब्लू क्रॉस व रिलायेबल कंपनीतील कामगार बंधू भगिनींनी सिटी सेंटर मॉल येथे निदर्शने केली. फिनोटॅक्स फायबर कास्ट लि अंबड येथील कामगारांनी  उपेंद्र नगर भाजी मंडई येथे केंद्र व राज्य सरकार विरोधी निदर्शने केले. देवी इंटरप्रायजेस मधील कामगार डी जी पी नगर कामठवडा येथे आंदोलनात सहभागी झाले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पीककर्जासाठी भाजपचे बँकांमध्ये ठिय्या आंदोलन

Next Post

डॉ.सुभाष चौधरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

डॉ.सुभाष चौधरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011