बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी समुपदेशन करावे

by India Darpan
ऑगस्ट 2, 2020 | 11:02 am
in राज्य
0
Governor News 2 750x375 1

‘मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण’ कार्यक्रमात राज्यपालांचे निर्देश

मुंबई – कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी व युवक यांच्यापुढे आव्हानात्मक परिस्थिती उभी आहे. या परिस्थितीतून युवकांना बाहेर काढण्यासाठी व समाजाला जागरूक करण्यासाठी शिक्षकांना समुपदेशक म्हणून भूमिका पार पाडावी लागेल.

देशाला प्रगतीच्या वाटेने पुढे न्यायचे असेल तर ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ या मानसिकतेतून बाहेर पडून ‘खबरदारी घ्या आणि आनंदी राहून कार्य करा’ (Be Careful and Be Cheerful) हा मूलमंत्र अंगिकारावा लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभागाने महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या ‘मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण’ या सात दिवसांच्या ऑनलाइन कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपालांनी दृकश्राव्य माध्यमातून राजभवन, मुंबई येथून केले, त्यावेळी ते बोलत होते.

नैराश्य किंवा विषाद ही मनुष्यात निर्माण होणारी एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, शेतकरी आणि राजकारणी यांसह सर्वांना कधी ना कधी निराशा येत असते. मात्र, ही प्रवृत्ती अभ्यास, निष्ठा व समर्पण भावनेने घालविता येते असे सांगून भगवदगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या मार्गदर्शनाने घोर नैराश्यातून बाहेर काढून कर्तव्य करण्याला प्रवृत्त केले, असे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनीदेखील तुरुंगामध्ये राहून निराश न होता गीता रहस्याची निर्मिती केली, याचे स्मरण राज्यपालांनी दिले. साॅक्रेटिस, प्लेटो, कॉनफुशियस, ताओ तसेच संतसाहित्याच्या वाचनाने नैराश्य दूर होण्याला मदत होऊ शकते असे राज्यपालांनी सांगितले. भारतातील युवकांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरू गोविंद सिंग यांचा थोर वारसा लाभला आहे, त्यामुळे युवकांनी निर्भय होऊन देशाला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

शिक्षकांना समुपदेशक म्हणून मूलभूत प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारोहाला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे आदी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अण्णा भाऊंना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा

Next Post

लोकमान्य आणि अण्णा भाऊ दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते

India Darpan

Next Post
CM 0108

लोकमान्य आणि अण्णा भाऊ दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011