India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी शेट्टींकडून दिशाभूल

India Darpan by India Darpan
July 23, 2020
in Uncategorized
0

केंद्राने दूध पावडर आयात केलेलीच नसल्याचा डॉ. बोंडे यांचा दावा

मुंबई ः दूध उत्पादकांना रास्त भाव देण्यात महाआघाडी सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी काही मंडळी केंद्र सरकारने दूध पावडर आयात केली असल्याची खोटी माहिती पसरवत आहेत, असा आरोप  भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. दूध पावडरच्या आयातीबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम पसरविण्यात येत आहे. दूध उत्पादकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही डॉ. बोंडे यांनी केले आहे.

    प्रसिद्धी पत्रकात  डॉ. बोंडे यांनी म्हटले आहे की , अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अलीकडेच भारतीय जनता पार्टीने राज्यभरात आंदोलन केले. महाआघाडी सरकारला समर्थन देणारे राजू शेट्टी यांनीही २१ ऑगस्ट ला दूध भावाकरिता आंदोलन केले. शेट्टी यांनी केंद्र सरकारने दूध पावडर आयात केल्याने दूध उत्पादकांना भाव वाढवून मिळत नसल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात केंद्र सरकारने दूध पावडर आयात केलीच नसल्याची माहिती मिळाली आहे. वाणिज्य मंत्रालयातून देण्यात आलेल्या माहिती नुसार २३ जून रोजी केंद्र सरकारच्या अर्थ विभागाद्वारे सूचनेमध्ये गॅट  करारान्वये भारताला आयात करावयाच्या वस्तूंबद्दल माहिती दिलेली आहे. जागतिक व्यापार संघटनेची ही  बंधने मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मान्य केलेली आहेत.

याकडे लक्ष द्या

गॅट कराराप्रमाणे भारत सरकारला २०१४-१५ ते २०१९-२० या कार्यकाळात ५ लाख मेट्रिक टन मका, १० हजार मेट्रिक टन दूध व मलाई पावडर रुपात, सूर्यफुल तेल दिड लाख मेट्रिक टन, रिफाइन्ड सरकी, मोहरी  तेल दीड लाख मेट्रिक टन घेणे आवश्यक आहे. या संदर्भातील सूचना काढल्यानंतर मका, दूध आयात करण्यात आले, अशी अफवा उठविण्यात आली. नाफेड व अन्य एका संस्थेला ५ लाख मेट्रिक टन मका आयात परवाना देण्यात आला होता. या परवान्याची मुदत फेब्रुवारी २०२१ पर्यंत असली तरी अद्याप पर्यंत या संस्थांनी मका आयात केलेला नाही. या संस्थांनी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार भारतामधूनच शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्याचे नियोजन व कारवाई केली आहे. मका खरेदीला ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गॅट करारा नुसार १० हजार मेट्रिक टन दूध पावडर आयात करण्याचे बंधनकारक असले तरी कोणत्याही आयातदाराचे इच्छापत्र दिलेले नाही व कोणालाही आयातीचा परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे दूध पावडर आयात करण्यात आली हा दावा संपूर्णत: निराधार व फसवा आहे. या प्रमाणेच मोहरी ,सरकी व सूर्यफूल तेलाच्या आयातीसाठी आयातदार संस्थेकडून मागणी करण्यात आलेली नाही तसेच या तेलाच्या आयातीचा कोणालाही परवाना दिला गेलेला नाही.


Previous Post

पंतप्रधानांच्या हस्ते मणिपूर पाणीपुरवठा प्रकल्पाची पायाभरणी

Next Post

मजूर कुठल्याही ठिकाणी असले तरी त्यांना वैद्यकीय लाभ

Next Post

मजूर कुठल्याही ठिकाणी असले तरी त्यांना वैद्यकीय लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर रणवीर सिंगने सोडले मौन; म्हणाला…

March 31, 2023

केवळ न्यायालयीन लढ्यावर इतक्या कोटींचा खर्च; अद्यापही न्यायालयाचा निकाल नाही

March 31, 2023

पीएमश्री योजनेत राज्यातील एवढ्या शाळांची निवड; केंद्र सरकारने दिली मान्यता

March 31, 2023

काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास

March 31, 2023

भाजप आमदारांचा कारभार कसा आहे? पक्षाने केले सर्वेक्षण… असा आहे त्याचा निष्कर्ष…

March 31, 2023

यंदाचे मराठी साहित्य संमेलन अमळनेरमध्ये? हालचालींना वेग

March 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group