राज्यभरातील दुकाने उघडण्याबाबत व्यापारी संघटनांची आज सायंकाळी पुन्हा बैठक

मुंबई – राज्यभरातील दुकाने उघडण्याबाबत व्यापारी संघटनांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने सर्व व्यापारी संघटनांची पुन्हा बैठक आज १० एप्रिल रोजी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली  ६.३० वाजता आयोजित केली आहे. या ऑनलाईन बैठकीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी,प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे यांनी केले आहे.
कोरोनामुळे पहिले लॉक डाऊन करण्यात आले. त्यानंतर हळू हळू सगळे सुरू झाले. मग पुन्हा  कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ब्रेक द चेन करण्यात आले, कड़क निर्बंध लावण्यात आले. आणि आता पुन्हा लॉकडाउन ?  पुढे काय ? हे प्रश्नचिन्ह आहे. या बाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याचे चेंबरतर्फे सांगण्यात आले.
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/84423316251?pwd=R0x1MmlrUi9tZmc5Q2ZDekdKQnEzUT09
Meeting ID: 844 2331 6251
Passcode: 077229