Last updated on August 6th, 2020 at 10:12 am
नाशिक – ‘जिजाऊच्या लेकी महिला मंच’च्या सदस्यांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. “रंगो में खाकी हातो में राखी. समझो तो बडा महत्व है इनका”, असे म्हणत मंचच्या सदस्यांनी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना राखी बांधली. तसेच, त्यांच्यासह संपूर्ण पोलिस दलाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी मंचच्या संस्थापिका प्रियांका भट, सोनाली बिचवे, शीतल श्रीवास्तव, स्नेहा मोडक, श्वेता खोडे, स्नेहल आंबेरकर, सुवर्णा भंडारे, अश्विनी पगारे, रेखा कदम, विभांगी पतकरी आदी उपस्थित होते.