बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवल्यात शासकीय बाजरी खरेदी केंद्र सुरू करा; अॅड माणिकराव शिंदे यांची मागणी

by India Darpan
सप्टेंबर 8, 2020 | 9:18 am
in स्थानिक बातम्या
0
EFNl9 gUEAAWrko

येवला – शासकीय भरड धान्य खरेदी योजनेअंर्तगत येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शासकीय बाजरी खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते अॅड माणिकराव शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे पत्राद्वारे केली आहे. आधारभूत किंमत २१५० रुपये दराने बाजरी खरेदी करुन बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की, तालुक्याच्या इतिहासात आज पर्यंत शासकीय बाजरी खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. मात्र या वर्षी खरिप हंगाम २०२० -२१ मध्ये तालुक्यात ८ हजार हेक्टर बाजरीची पेरणी झालेली असून आज रोजी ११०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभावाने बाजरी विक्री होत आहे. खरिपाची बाजरी बाजारात विक्रीसाठी आली तर प्रति क्विंटल १००० रुपयाच्या आत बाजरी धान्याची विक्री होणार आहे. या कवडीमोल भावात बाजरीच्या पिकाचा उत्पादन खर्चही निघणार नाही, असे नमूद केले आहे.
बाजरी धान्याचा शासकीय हमी भाव (२१५०) व सध्याचा चालू बाजारभाव (१०५०) यातील तफावती नुसार शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ११०० रुपयाचे नुकसान होणार आहे. येवला तालूका कृषी अधिकारी यांच्या अहवालानुसार ८ हजार हेक्टर खरिप बाजरीची पेरणी झाली असुन एकरी १३ क्विंटल उत्पादनाची सरासरी या वर्षी राहिल. ८ हजार हेक्टर पैकी साडेपाच हजार हेक्टरचीच अपेक्षित बाजरी उत्पादन विक्रीसाठी बाजारात आल्यास १७८७५० क्विंटल इतकी आवक राहिल., असे पत्रात म्हटले आहे.
शासकीय आधारभुत किंमतीने बाजरी धान्याची खरेदी शासनाने केली नाही तर आधारभुत बाजरीची किंमत व सध्याचे बाजारभाव यातील फरक प्रति क्विंटल ११०० रु. नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागेल. परिणामी तालुक्यातील बाजरी धान्य उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध १,७८,७५० क्विंटल बाजरी धान्याच्या माध्यमातून २० कोटी रुपयाचा फटका बसणार आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
बाजरी पिकाचा उत्पादनाचा खर्च एकरी १७, ५०० रूपये इतका असून आजच्या बाजारभावाप्रमाणे फक्त १३६५० रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. बाजरी पिकात शेतकऱ्यांना घरातून पैसे घालावे लागणार आहेत. शासकीय बाजरी खरेदी केंद्र या वर्षापासून सुरू करून २१५० या दराने बाजरी खरेदी करावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. बाजरी खरेदीसह या वर्षापासून तालुक्यात ज्वारी, मूग, उडीद यांची सुद्धा शासकीय खरेदीला सुरुवात करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिक्षण व जनजागृतीसाठी शिक्षक साळुंके यांची धडपड

Next Post

इतर आकार जोडून वीजबील वसुली नको; येवला व्यापारी महासंघाची मागणी

India Darpan

Next Post
IMG 20200826 WA0017

इतर आकार जोडून वीजबील वसुली नको; येवला व्यापारी महासंघाची मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011