India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मिशन झिरो अभियानात मिळाले ५०५५ पॅाझिटिव्ह रुग्ण, बरे होण्याचे प्रमाणही जास्त

India Darpan by India Darpan
August 21, 2020
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांचे पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या मिशन झिरो नाशिक या एकात्मिक कृती योजनेत २८ दिवसात ५ हजार ५५ रुग्ण अँटीजेन चाचण्यामध्ये आढळून आले. आतापर्यंत या अभियानातंर्गत ३८ हजार ७११ अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे या चाचण्यात आलेल्या पॅाझिटिव्ह रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही मोठे असल्यामुळे या चाचण्या उपयोगी ठरल्या आहेत.

शुक्रवारी १२९२ नागरिकांनी आपल्या अँटीजेन चाचण्या करून घेतल्यात, त्यापैकी  २८७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. लोकांमध्ये कोरोनाची भीती कमी करण्यासाठी हे अभियान उपयोगी पडत आहे. शहरातील विविध भागात २२ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन फिरत आहे. या अभियानात २२५ च्या आसपास कर्मचारी व कार्यकर्त्यांची टीम कार्यरत आहे.

असे सुरु असते काम

मिशन झिरो नाशिक अंतर्गत लक्षणे असलेल्या तसेच वयस्कर व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी होत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांना शोधून काढण्यात यश येत आहे. त्याचबरोबर अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आलेल्या रुग्णांची कोरोना बद्दलची भिती दूर होऊन त्यांना दिलासा मिळत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर शोधून काढणे, लगेच औषधे व उपचार करणे, आयुर्वेदिक काढा देणे, समुपदेशन करणे, रुग्णांचा पाठपुरावा करणे व कुटुंबातील व संपर्कातील इतर सदस्यांचीही तपासणी करणे हे काम या अभियानात केले जात आहे.

अभियानात या संस्थाचा मोठा सहभाग

मिशन झिरो नाशिक मध्ये महानगरपालिकाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस आयुक्तालय, भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते , सैफी ऍम्बुलन्स कॉर्पसचे सेवाभावी कार्यकर्ते, गुरुद्वारा नाशिकरोड, किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, व्हिजन अकॅडमी, साधना फाऊंडेशन, मातोश्री ट्रॅव्हल्स, एस्पिलियर स्कूल, डॉ. स्वप्नील साखला व टीम, फार्मासिस्ट, लॅब टेक्नीसिएन, शिक्षक, स्थानिक सामाजिक व  राजकीय कार्यकर्ते अशा अनेक संस्था व व्यक्ती यांचा सहभाग आहे.

 हे करता अभियानाचे नियोजन

महापौर सतीशनाना कुलकर्णी, आयुक्त राधाकृष्ण गमे, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते,भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प प्रमुख नंदकिशोर साखला, कार्यकारी अभियंता सी. बी आहेर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंके, रवींद्र बागुल, बीजेएसचे  दीपक चोपडा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, विजय बाविस्कर, सचिन जोशी, यतिश डुंगरवाल, गोटू चोरडिया, ललित सुराणा, रोशन टाटिया, संदिप ललवाणी, डॉ.उल्हास कुटे, डॉ. भागवत सहाणे, गौतम हिरण यांचा मोठा सहभाग आहे.


Previous Post

हे पाच खेळाडू बनले ‘खेलरत्न’; केंद्र सरकारने केली पुरस्कारांची घोषणा

Next Post

नेटरंग – इंटरनेट आणि तंत्रज्ञानाची माहिती देणारे अनोखे सदर

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नेटरंग - इंटरनेट आणि तंत्रज्ञानाची माहिती देणारे अनोखे सदर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरती; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण

September 29, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group