मालेगाव – छोट्या व्यवसायिकांना व्यवसाय करण्याची अनुमती द्यावी, साई एकता हॉकर्स युनियनची मागणी

मालेगाव- ब्रेक द चेन कार्यक्रम अंतर्गत रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे हॉकर्स यांचा व्यवसाय पूर्णतः बंद करण्यात आला आहे. परंतु शासकीय अध्यादेशानुसार जीवनावश्यक बाबी आणि खाद्यपदार्थ स्टॉल यांच्या वस्तूंचा पुरवठा पार्सल पद्धतीने करता येऊ शकतो. परंतु मालेगाव मनपाने पूर्णतः सरसकट लॉकडाऊन केले आहे. परिणामी नाष्ट्याच्या आणि फूडच्या व्यावसियांकावर उपासमारीची वेळ आली आहे तरी शासनाच्या धोरणानुसार छोट्या व्यवसायिकांना व्यवसाय करण्याची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी प्रभाग एकचे प्रभाग अधिकारी हरिष डिंबर यांना साई एकता हॉकर्स युनियनने निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी युनियनचे अध्यक्ष सुधाकर जोशी, सरचिटणीस दिनेश ठाकरे, असिफ तांबोळी, श्याम करपे, ललित कैचे, राजेंद्र घोडके, संदीप आहिरे, मनोहर सोनग्रा, सोनू जाधव, निशात अहमद, दिनेश मोरे, तन्वीर पठाण, रवी देवरे, संतोष घुले, योगेश जाधव, अमोल बागुल, आशा थोरात, दिलीप गोरे, प्रवीण थोलकिया आदी उपस्थित होते