India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

…. मात्र माझ्या अनुभवांती शासनाचे शतश: आभार !

India Darpan by India Darpan
August 5, 2020
in विशेष लेख
0

सौ. सुनिता चंद्रकांत म्हात्रे, मु. रांजणखार, पो. नारंगी, ता. अलिबाग, जि. रायगड या त्यांच्या परिवारासोबत मुंबईमध्ये बोरिवली येथे राहणाऱ्या गृहिणी. मुंबईमध्ये करोनामुळे झालेला हाहा:कार सर्वश्रुत आहेच. सौ.म्हात्रे यांनी सुद्धा मुंबईत बंदच्या काळात जवळजवळ ५० दिवस घरामध्येच काढले. परंतु जीवनावश्यक वस्तूंसाठी कधीतरी बाजारात जावे लागत होते आणि त्यांना नकळतच काेरोनाची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र त्यांना स्वत:ला काेरोनाची लागण झाली असेल, याची पुसटशी देखील कल्पना नव्हती.

  •  मनोज सानप
दि.३ जून २०२० रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे त्यांच्या गावातील घराचेही मोठे नुकसान झाले, झाड पडल्याने झालेलं घराचं नुकसान या कारणाने गावातील उपसरपंचांच्या परवानगीने त्या गावी आल्या. अशा वेळी गावी असताना दि. ११ जून ला त्यांना अचानक ताप आल्याने एका खाजगी दवाखान्यात तपासणीसाठी नेले असता त्यांना पेढांबे येथील सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे तपासणी केली असता त्या काेरोनाबाधित झाल्याचे निदान झाले. त्यामुळे घरातील इतर सदस्यांची सुद्धा चाचणी झाली आणि त्यांच्या घरातील आणखी ४ सदस्य करोनाबाधित झाल्याचे आढळून आले. त्यामुळे सौ.म्हात्रे यांच्यासह घरातील चार सदस्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आणि एका सदस्याला सौम्य लक्षण असल्याने घरीच विलगीकरण करून औषधोपचार करण्यास सांगितले.

सौ. सुनिता चंद्रकांत म्हात्रे अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यावर आलेला अनुभव अत्यंत वेगळा होता. बहुतांश लोकांचे सरकारी दवाखान्याबाबत खूप वाईट अनुभव,वाईट मते असतात. परंतु सौ.म्हात्रे त्यांचा अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा अनुभव सांगताना म्हणाल्या, आम्ही ज्या वार्डमध्ये होतो तेथील अनुभव आमच्यासाठी अनपेक्षित होता. सर्व परिचारिका, यात प्रामुख्याने सौ. तृप्ती म्हात्रे, अनुजा घरत, प्रज्ञा चौगुले, श्रुती जाधव, चैताली वाघमारे तसेच डॉक्टर्स व वार्ड बॉय उत्तम प्रकारे सेवा देत होते. कोणत्याही प्रकारचे ओरडणे नाही की खेकसणे नाही.  तेथे औषधोपचारासोबत जेवणाची व्यवस्थासुध्दा मोफत होती.  बाथरूमसुद्धा स्वच्छ होते. हे सर्व अनपेक्षित होते. काही दिवसातच आम्ही सर्व म्हणजे माझ्या ९० वर्षांच्या सासऱ्यांसहित आम्ही चौघेही पूर्णपणे काेरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतलो.

अनुभव कथन करीत त्या पुढे म्हणाल्या की, काेरोना आणि सरकारी रुग्णालयाबद्दलचा जनमानसात प्रचंड गैरसमज आहे. तो दूर व्हायला पाहिजे. मी काेरोनाबधित आढळल्यानंतर आमच्या परिवाराकडे पाहण्याचा शेजारी आणि नातेवाईकांचा दृष्टीकोन बदलला होता. जो तो आम्हाला अस्पृश्य असल्यासारखी वागणूक देत होता. क्वारंनटाईन केल्यानंतर कोणत्याही प्रकारची मदत करण्यास कोणीही तयार नव्हते तसेच जो कोणी मदत करेल त्याचीही अडवणूक केली जायची. पिण्यासाठी पाणीसुद्धा मिळत नसल्याने टँकर मागविला असता शेजाऱ्यांनी त्यासदेखील विरोध केला. किराणा सामान आणायचे कसे हा प्रश्न उभा राहिला. मात्र या परिस्थितीतही स्थानिक प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करुन माझ्या सारख्या अनेकांना वेळीच मदत करुन  शासन किंवा शासकीय अधिकारी काहीच करीत नाहीत, हा गैरसमज दूर केला.  आधी काेरोनाचे संकट व नंतरचे निसर्ग चक्रीवादळाचे संकट, या दोन्ही संकटात पालकमंत्री कु.आदिती तटकरे, इतर लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन या सर्वांनीच रायगडकरांची  घेतलेली काळजी, त्यांना मदत मिळण्यासाठी केलेले अहोरात्र प्रयत्न याला तोड नाही.

लोक काहीही म्हणो…. परंतु मला स्वत:ला या काळात जो अनुभव आला, त्या अनुभवांती मी सौ. सुनिता चंद्रकांत म्हात्रे, मु. रांजणखार, पो. नारंगी, ता.अलिबाग शासनाचे त्यांनी पुरविलेल्या सोयी-सुविधांबद्दल, शासन करीत असलेल्या कामाबद्दल शतश: आभार मानते.

(जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग)

(साभार – महासंवाद)


Previous Post

वाढत्या मृत्यूदरांचे राज्य सरकारला गांभीर्य नाही

Next Post

स्टेट बँकेत घोटाळा, सहा अधिकारी व रिअल इस्टेट फर्मवर सीबीआयने दाखल केला गुन्हा

Next Post
संग्रहित फोटो

स्टेट बँकेत घोटाळा, सहा अधिकारी व रिअल इस्टेट फर्मवर सीबीआयने दाखल केला गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर इतके लाख लेखापरीक्षण अहवाल दाखल, प्राप्तिकर विभागाने मानले आभार

October 2, 2023

खंडणी मागायला आले अन् जाळ्यात अडकले

October 2, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावे, जाणून घ्या.. ३ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 2, 2023

येवल्यात मुसळधार पाऊस; दुकान व घरात पाणी शिरले, दुचाकी रस्त्यावर आडव्या झाल्या (बघा व्हिडिओ)

October 2, 2023

कांदा व्यापा-यांचा संप अखेर मागे, नाशिक जिल्हयातील १३ कृषी बाजार समितीत पुन्हा कांदा लिलाव होणार सुरु

October 2, 2023

सिन्नर तालुक्यातील या गावाच्या प्रश्नांसाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले हे निर्देश

October 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group