India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मराठी माणसाचा अंदमानमध्ये झेंडा. थेट चेन्नई ते अंदमान टाकली केबल

India Darpan by India Darpan
August 10, 2020
in राष्ट्रीय
1

– अंदमान व निकोबार बेटांना दूरसंचाराच्या जलद सेवेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण
– युएसओएफचे संचालक विलास बुरडे या मराठी भुमीपुत्राने मर्यादित वेळेत पार पाडली जबाबदारी

नवी दिल्ली – भारताच्या पूर्व भागाला असणारया अंदमान व निकोबार बेटांनाही उर्वरित देशाप्रमाणे जलद संचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान २३०० किलो मीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्रात टाकण्यात आली आहे.  सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीयो कॉन्फरन्सिंगव्दारे या प्रकल्पाचे
लोकार्पण होणार आहे.  हा प्रकल्प युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) च्या देखरेखीत पूर्ण करण्यात आला आहे. या युएसओएफ चे संचालक विलास बुरडे आहेत. बुरडे महाराष्ट्राचे असून त्यांनी मर्यादित वेळेत या प्रकल्पाची जबाबदारी पार पाडली .

असा आहे प्रकल्प
सबमरीन केबल चेन्नई ते पोर्ट ब्लेअर आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगत या आठ द्वीपांना जोडली जाणार आहे. या जोडणीमुळे देशातील इतर
भागांप्रमाणेच अंदमान आणि निकोबार बेटांवरही मोबाईल आणि लँडलाईन दूरध्वनी सेवा जलद आणि अधिक विश्वासार्ह होणार आहे. चेन्नई ते पोर्ट ब्लेअर दरम्यान सबमरीन ओएफसी लिंक २ x २०० जीबीपीएस प्रतिसेकंद  बँडविड्थ असणार आहे. आणि पोर्ट ब्लेअर व इतर बेटांदरम्यान २ x १०० जीबीपीएस असणार आहे. यामुळे टेलिकॉम आणि ब्रॉडबँड सुविधांची तरतूद करता येईल. आधी मिळत असलेल्या मर्यादित सेवांचे रूपांतर जलद गतीत होईल, ४ जी मोबाईल  सेवांमध्ये मोठया सुधारणा दिसून येतील. सुधारीत टेलिकॉम आणि ब्रॉडबँड जोडणीमुळे बेटांवर पर्यटन व्यवसायाला अधिक प्रोत्साहन मिळेल,  रोजगार वाढतील, अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल आणि स्थानिक राहणीमानाचा दर्जा सुधारेल.  चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे टेलिमेडिसीन आणि टेली-एज्युकेशन या ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुलभ होईल. लहान उद्योजकांना ई-कॉमर्समुळे संधी निर्माण होतील तर शैक्षणिक संस्था विस्तारीत बँडविडथचा वापर ई-लर्निंग आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी करतील .

विलास बुरडे यांची चढती झेप

विलास बुरडे

सदर प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभागाच्या युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) ने महत्वपुर्ण भूमिका निभावली आहे  या युएसओएफचे संचालक विलास बुरडे आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने युएसओएफ अंतर्गत दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार खात्यामार्फत निधी पुरवला आहे. भारत संचार निगम लिमिटेडने हा प्रकल्प अंमलात आणला आहे तर टेलिकम्युनिकेशन्स कन्सलटन्टस इंडिया लिमिटेड प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार कंपनी आहे. प्रकल्पासाठी १ हजार २२४ कोटी रुपये खर्च करुन सुमारे २३०० किलोमीटर सबमरीन ओएफसी केबल टाकण्यात आलीआहे. प्रकल्पाचे काम नियोजीत वेळेत पूर्ण झाले आहे. बुरडे वर्ष १९९५ मध्ये भारतीय दूरसंचार सेवेत रूजु झालेत. त्यांनी मुंबई, ठाणे, नाशिक आणि सुरत  येथे विविध पदांवर महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. तसेच दूरसंचार खात्याला मोठया प्रमाणात मलसूलही गोळा करून दिला. वर्ष २०१३ ला ते दिल्लीत  कर्मचारी निवड आयोगाचे (SSC) प्रादेशिक संचालक म्हणून प्रतिनियुक्तिवर आलेत. त्यांच्या कार्यकाळात जवळपास ३ हजार उमेदवार केंद्र शासनाच्या सेवेत रूजु झालेत. बुरडे दिल्लीतील विविध मराठी संस्थांमध्ये ही सक्रीय असतात. २०१६ मध्ये दूरसंचार विभागातील (युएसओएफ) च्या संचालक पदाचा पदभार बुरडे यांनी स्वीकारला. त्यांच्याच कार्यकाळात सदर महत्वकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते ३० डिसेंबर २०१८ रोजी पोर्ट ब्लेअर येथे करण्यात आली. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून सोमवारी मोदी या प्रकल्पाचे लोकार्पण करतील, याचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रीया बुरडे यांनी व्यक्त केली.

प्रकल्पाची काही छायाचित्र


Previous Post

पहा नौदलाची अनोखी मानवंदना

Next Post

कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्यावतीने निदर्शने

Next Post

कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्यावतीने निदर्शने

Comments 1

  1. Shripal says:
    3 years ago

    Nice work dear Gautam

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरती; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण

September 29, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group