मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारत-चीन तणाव : हे तर माहिती युद्धच

by Gautam Sancheti
सप्टेंबर 14, 2020 | 10:15 am
in इतर
0
IMG 20200914 WA0016

चिनी गुप्तचर संस्था भारतात राष्ट्रपतींपासून ते एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरुपर्यंत सर्व महत्त्वाच्या व्यक्तींवर नजर ठेवून आहेत असा गौप्यस्फोट एका वृत्तपत्राने आज केला आहे. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्य अडचणीत सापडलेले असताना अशी बातमी प्रसिद्ध हावी हा काही अजब योगायोग नाही. हे एकप्रकारचे माहिती युद्धच आहे.
दिवाकर देशपांडे
दिवाकर देशपांडे
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षणशास्त्र तज्ज्ञ आहेत)
चीन भारतापेक्षा सर्व क्षेत्रात कसा पुढे आहे, त्याचे तंत्रज्ञान कसे प्रगत आहे, त्याचे लष्कर भारतापेक्षा कसे बलवान आहे, एकूणच चीन भारताला कसा कच्चा खाऊ शकतो हे सांगणाऱ्या  बातम्या, व्हिडिओ, सॅटेलाईट चित्रे, लेख गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होऊ लागले आहेत. चीनने भारताविरुद्ध बहुअंगी युद्ध छेडले आहे, त्याचाच हा भाग आहे. त्यामुळे या आघाडीवरही भारताला लढावे लागणार आहे.
सध्या तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, कुणीच कुणापासून काही लपवू शकत नाही. इंटरनेट, आकाशातील उपग्रह, मोबाईल तंत्रज्ञान या माध्यमांतून जगातल्या कानाकोपऱ्यातून डेटाप्रवाह वाहत असतो. त्यात विविध प्रकारची माहिती खच्चून भरलेली असते. तिचा वापर प्रत्येक जण आपापल्या फायद्यासाठी करीत असतो. साधा चोरही हल्ली बँकांतील खात्यांची माहिती काढून बँकखात्यातून परस्पर रकमा पळवीत असतात. त्यामुळे भारताचे लष्करप्रमुख सकाळी उठून कोणत्या कारमधून कोणत्या लष्करी ठाण्यावर गेले आहेत, ही माहिती लपवायची म्हटले तरी लपत नाही. तसेच भारताच्या कोणत्या युद्धनौका कोणत्या बंदरावर आहेत, हेही लपत नाही.
सीमेवर भारतीय किवा चिनी लष्कराची कोणती हालचाल चालू आहे, हे टिपण्यासाठी उपग्रह, ड्रोन, उच्चक्षमतेचे कॅमेरे सतत नजर रोखून आहेत. त्यामुळे चिनी गुप्तचर संस्था भारतातील महत्त्वाच्या व्यक्तींवर नजर ठेवून आहेत ही बातमी सोळा आणे शिळी आहे. सर्वच देश हे सर्व करीत असतात. भारतही यात मागे आहे असे समजण्याचे कारण नाही. आपण जगात फार अप्रगत आहोत, आपल्यात स्ट्रिट स्मार्टनेस नाही, वगैरे गैरसमज आपण आपलेच करून घेतले आहेत आणि काही तुच्छतावादी पत्रपंडित हे गैरसमज आपल्या लिखाणातून आपल्या मनात सतत रुजवीत असतात. पण जग तसे काही समजत नाही. भारताची दुर्बलस्थाने व बलस्थाने याची जगाला चांगली माहिती आहे.
लडाखमधील तणाव सुरू झाला तसे एक इंग्रजी वृत्तवाहिनी सतत उपग्रह चित्रांचा हवाला देऊन चीनने किती भयानक युद्धसामुग्री नियंत्रण रेषेवर जमवली आहे व त्याने कशी हानी होऊ शकते, याचे चित्तथरारक वर्णन आपल्या बातमीपत्रातूंन करीत असते. याचा फायदा काय तर त्या वाहिनीला टीआरपी मिळत असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, चीन आपली गुप्त युद्धतयारी उपग्रहांना दिसेल अशा पद्धतीने करील काय. चीनचे हे दाखवायचे दात आहेत. चीनची प्रत्यक्ष युद्ध करून मोठी हानी पत्करायची तयारी नाही, त्याला गोळीही न झाडता युद्ध जिंकायचे आहे. त्यासाठी हे सर्व प्रचारयुद्ध आहे.
संरक्षणविषयक इंग्रजी मासिकाचे एक संपादक आहेत. त्यांचे विवेचन ऐकल्यावर तर ते चीनच्या ग्लोबल टाइम्स या प्रचारी वर्तमानपत्रात तर काम करीत नाहीत ना अशी शंका यावी. ते लडाखमध्ये चीनने जमवाजमव केली तेव्हापासून युट्यूबवर व्हिडिओ टाकून चिनी हालचालींचे लष्करी विवेचन करीत असतात. त्यांनी तर आपल्या विवेचनात सतत चीनच्या राक्षसी बळापुढे भारताचा निभाव लागणार नाही, त्यामुळे भारताने चीनचे म्हणणे मान्य करावे व माघार घ्यावी असे थेट सुचवले आहे.
ज्या दिवशी जयशंकर आणि वाँग यी यांच्यात सैन्य मागे घेण्याच्या समझोता झाला त्याच दिवशी रात्री त्यांनी एक व्हिडिओ टाकून या करारातील सगळी कलमे कशी चीनच्या फायद्याची आहेत, हे हातातील कागद वाचत कलमवार सांगितले. हे कागद इतक्या तातडीने त्यांना कुठून उपलब्ध झाले याची खरे तर भारतीय गुप्तचर खात्याने चौकशी करायला हवी. ही कलमे चीनच्या फायद्याची आहेत, हे जयशंकर याना कळलेच नाही आणि या संपादक महाशयांना कळले असे म्हणावे का?
चीनच्या गुप्तचर संस्था भारतात कार्यरत आहेत हे नाकारण्यात अर्थ नाही. विशेषत इलेक्ट्रॉनिक उद्योगात या हेरांनी खूप मोठा शिरकाव केला आहे. भारताने चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर चीनचे जितके आर्थिक नुकसान झाले त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान या गुप्तचर संस्थांचे झाले आहे. त्यामुळे चीनची सतत मागणी चालू आहे की, व्यापार आणि सीमेवरील वाद यांची सांगड घालू नका, दोन्ही वेगळे ठेवा. म्हणजे चीनला दोन्हीकडचे युद्ध गोळीही न झाडता जिंकता येईल. सुदैवाने भारतानेही चीनच्या या बहुअंगी युद्धाला बहुअंगी आघाड्यांवरच तोंड द्यायचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत सरकारचीही प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे आणि तिनेही चिनी प्रचारयंत्रणेची पोलखोल सुरू केली आहे.
चीन हा जगातला एक मोठा बागुलबुवा आहे. चीनशी टक्कर घेण्याची भारताची क्षमता नाही, हे तो विविध प्रकारे भारतीयांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामागचा हेतू चीनला कोणतीही हानी न पत्करता त्याचे राजनीतिक हेतू साध्य करता यावेत हा आहे. पण आपण तसे होऊ देणार का हा प्रश्न आहे. शेवटी युद्ध झाले तर त्यात त्यात हारजीत ठरलेली आहे, पण युद्धाचे वाईट परिणाम ते जिंकणाऱ्यालाही भोगावे लागणार आहेत, हे भारतीयांनी विसरू नये. हे युद्ध टाळायचे असेल तर भारताला चीनपेक्षाही मोठ्या आवाजात बोलावे लागेल. आजवर आपण दबक्या आवाजात बोलत होतो, त्यामुळेच आजची परिस्थिती उद्भवली आहे. हा युद्धज्वर वाढविण्याचा प्रयत्न नाही. युद्ध होणे भारताच्या हिताचे अजिबात नाही, पण ते झालेच तर ते चीनच्याही हिताचे ठरणार नाही. त्यामुळे ते टाळण्याचा सतत प्रयत्न करायला  हवा..
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या साक्री तालुका उपाध्यक्षपदी यश सोनवणे

Next Post

तमाशा अनुदान चालू करा; अ. भा. मराठी तमाशा परिषदेची मागणी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
unnamed 6

तमाशा अनुदान चालू करा; अ. भा. मराठी तमाशा परिषदेची मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Screenshot 20250714 200642 Collage Maker GridArt 1

नाशिक जिल्हा परिषदेच्या सुपर ५० उपक्रमातील ६ विद्यार्थ्यांची आयआयटीत निवड…

जुलै 14, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884

विजयी मेळावा हा मराठीच्या मुद्द्यावर होता, राजकारणाशी संबध नाही…राज ठाकरे

जुलै 14, 2025
VidhanSabha prashnottare 04 1024x512 1

पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना; विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

जुलै 14, 2025
Mhada Home e1680604067392

घरांची विक्री मंदावली,खरेदीदार अधिक सावध…बघा, हा अहवाल

जुलै 14, 2025
Shirdi Sai baba e1727984889927

शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानला ६.३१ कोटींहून अधिक देणगी प्राप्त

जुलै 14, 2025
Untitled 32

नाशिकच्या या नेत्याचा ३०० कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात मुंबईत प्रवेश…

जुलै 14, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011