बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाडेवाढीसाठी संप; पिंपळगाव बसवंत ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटना आक्रमक

by India Darpan
सप्टेंबर 8, 2020 | 9:29 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200908 WA0024 e1599557349670

पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) – सहा वर्षांपासून मागणी करूनही भाडेवाढ केली नसल्याने पिंपळगाव बसवंत ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटनेच्या वतीने मंगळवार (८ सप्टेंबर) पासून संपाचे हत्यार पुकारले आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होऊ शकत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. येथील जुन्या मार्केट यार्डात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटनेच्या वतीने कांदा व्यापारी असोसिएशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दर तीन वर्षांनी भाडेवाढ करण्याचे ठरले होते. डिझेलचा भाव ४५ रूपये असताना जे भाडे मिळत होते तेच भाडे आता दिले जात आहे. सध्या डिझेलचा दर ८० रुपयांवर गेला असतानाही पुर्वीचेच भाडे व्यापारी असोसिएशन देत आहे. त्यामुळे चालक-मालक संघटनेचे मोठे नुकसान होत असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले. यावेळी ट्रक-टेम्पो असोसिएशनचे पदाधिकारी शांताराम खरात, जगदीश कोठाळे, बाळासाहेब घुमरे, फईम सय्यद, राजू सय्यद, कैलास रिकामे, सचिन गिते, दौलत विधाते, अण्णा सोनगिरे, अरूण खैरनार, वसंतराव निकम, रामदास कोठुळे यांच्यासह असंख्य चालक, कामगार उपस्थित होते.
दररोज दोन लाखांचे नुकसान
ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटनेचे ११५ ट्रक आहेत. दररोज एका वाहनामागे २ हजार याप्रमाणे दोन लाखांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे संप काळात परिसराला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
फेरी ठिकाण – जुने भाडे -वाढीव भाडे मागणी
1) कुंदेवाडी- १८०० – २४००
2) खेरवाडी- १८०० – २४०० (टोल)
3) सुकेणा- १८०९ – २४०० (टोल)
4) लासलगाव- २८०० – ३४००
5) मनमाड- ३९०० – ४५००
6) येवला- ४००० – ४६००
7) नगरसूल- ४५०० – ५१००
8) नाशिकरोड- ३१५० – ३६५० (टोल)
गेल्या सहा वर्षांपासून भाडेवाढ करण्यात आलेली नाही. ४५ रुपये डिझेलचा दर असताना जे भाडे मिळत होते तेच भाडे आता दिले जात आहे. त्यामुळे आमचे नुकसान होत आहे. मागणीप्रमाणे कांदा व्यापारी असोसिएशनने पूर्तता न केल्याने मंगळवारपासून संप पुकारण्यात आला आहे.
– जगदीश कोठाळे, पदाधिकारी, ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटना
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इतर आकार जोडून वीजबील वसुली नको; येवला व्यापारी महासंघाची मागणी

Next Post

अटी-शर्थींसह न्यायालये पूर्णवेळ सुरू करा; वकीलांची मागणी

India Darpan

Next Post
IMG 20200908 WA0027

अटी-शर्थींसह न्यायालये पूर्णवेळ सुरू करा; वकीलांची मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011