नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नातून बेरोजगारांसाठी स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचेचे उद्घाटन शहराध्यक्ष रंजन ठाकरे व युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन येथे पार पडले. यावेळी महिला अध्यक्षा अनिता भामरे, शहर सरचिटणीस संजय खैरनार, धनंजय निकाळे व योजनेचे प्रतिनिधी सचिन पवार उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक महामंदी निर्माण झाली असून यामुळे अनेकांचे रोजगार डबघाईला आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना याची झळ बसू नये याकरिता बेरोजगारांसाठी स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना महामारी परिस्थितीत सर्वसामान्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देत आर्थिक दृष्टीने बळकट करण्याचा महाआघाडी सरकारचा प्रयत्न आहे.
खैरे म्हणाले की, ही योजना शासनाची असल्याने सर्वसामान्य जनतेकरिता आहे. ही योजना दिनांक २६ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना सबसीडीचा लाभ घेता येणार आहे. त्याकरिता नियमात असलेली कागदपत्रे आवश्यक राहणार आहे. नागरिक आपल्या मर्जीतील व्यवसाय करू शकणार असल्याने सर्वांसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे. तरी इच्छुकांनी राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथे सकाळी १०.३० ते ६.०० या वेळेत संपर्क करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी उदय सराफ, विलास बोराडे, निलेश सानप, संतोष भुजबळ, संदीप गांगुर्डे, हर्षल चव्हाण, राहुल तुपे, सागर बेदरकर, विक्रांत डहाळे, डॉ.संदीप चव्हाण, राहुल पाठक, जय कोतवाल, राहुल कमानकर, करण आरोटे, भूषण गायकवाड, स्वप्निल चुंभळे, संदीप खैरे, सचिन मोगल, किरण सूर्यवंशी, अविनाश मालुंजकर, अमोल सूर्यवंशी, अविनाश भुजबळ, सिद्धार्थ दोंदे, अमित ताठे, पुष्पा राठोड, अपेक्षा अहिरे, संगिता पाटील, मीनाक्षी गायकवाड, वैशाली वायंगणकर, अक्षय परदेशी, कृष्णा काळे, चेतन सूर्यवंशी, सुनिल शेवाळे, प्रशांत घनकुटे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.