व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, December 1, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बुधवारचा कॉलम – फोकस – सोनेरी सिंहाचे लाल ड्रॅगनला आव्हान

India Darpan by India Darpan
September 9, 2020 | 1:35 am
in इतर
1

सोनेरी सिंहाचे लाल ड्रॅगनला आव्हान
भारत आणि चीन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचदरम्यान शहीद झालेले न्यीमा तेनसिंग यांचे शौर्य खरोखरच सलाम करण्यासारखे आहे. कोण होते ते? काय होते त्यांचे कर्तृत्व? याचा वेध घेणारा हा लेख….
डॉ. स्वप्निल तोरणे
डॉ. स्वप्निल तोरणे
(लेखक जनसंवाद अभ्यासक आहेत)
नाव – न्यीमा तेनसिंग..
वय वर्षे एक्कावन….
स्पेशल फायटर फोर्सचे कंपनी लीडर आणि तिबेटियन असलेल्या न्यीमा तेनसिंग यांना नुकतेच वीरमरण प्राप्त झाले. काही दिवसांपूर्वी लडाखच्या  पेंगॉंगच्या परिसरात कब्जा करण्याच्या चिनी सैन्याचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला. या संघर्षात न्यीमा तेनसिंगला वीरमरण प्राप्त झाले. नुकतेच त्याच्यावर लष्करी इतमामाने अंतिम संस्कार करण्यात आले. भारताच्या तिरंग्यात आणि तिबेटच्या सोनेरी सिंहाच्या ध्वजात त्याचे पार्थिव शरीर ठेवण्यात आले होते.
   
न्यीमा हे भारतीय लष्काराने स्थापित केलेल्या स्पेशल फायटर फोर्सचे  कंपनी लीडर होते. SFF म्हणजे स्पेशल फायटर फोर्स बहुतांशी जगापासून अपरिचित असलेली विशेष यंत्रणा आहे. भारत आणि चीनच्या १९६२ च्या युद्धाच्या काळात याची स्थापना झाली. यात कार्यरत बहुतांशी लोक हे तिबेटमधील तरुण लढवय्ये आहेत. स्थापनेपासून आज जवळपास साठ वर्ष ही यंत्रणा गुप्त स्वरूपात कार्यरत होती.  सहा दशकांच्या कालखंडात या स्पेशल फोर्सच्या अनेक  वीर जवानांनी विविध ठिकाणी आपल्या प्राणांची आहुती दिली. चीन, पाकिस्तान समवेत घडत असलेला अनेक चकमकी, बांगलादेश मुक्ती संग्राम आणि कारगिल युद्धात देखील या यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. सियाचीन सारख्या भागात आणि हिमालयातील अत्यंत दुर्गम भागात जेव्हा तापमान उणे  पन्नास असते तेव्हा देखील या सैनिकांचा उपयोग केला जातो.
 डोंगर दऱ्यात राहणारे, अत्यंत काटक, अत्यंत लहरी निसर्गाच्या सहवासात राहणारे शूर, पराक्रमी तिबेटीयन तरुण भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत.
         बौद्ध धर्माच्या वैचारिक अधिष्ठानाचे मनापासून पालन करणारे तिबेटियन नागरिक असतात. दलाई लामांच्या निर्देशाप्रमाणे आचार आणि विचार पालन करणाऱ्या तिबेटियन नागरिकांनी तिबेट व्यतिरिक्त भारताला आपला देश मानला आहे.
          जगाचे छप्पर म्हणून ओळखला जाणारा प्रदेश म्हणजे तिबेट याचे कारण म्हणजे हिमालय पर्वतरांगांच्या मध्ये जगातील सर्वाधिक उंच अशा ठिकाणी तिबेटचे पठार आहे. अंदाजे वीस लाख चौरस किलोमीटर असे क्षेत्रफळ असलेल्या या पठारावर जगातील अनेक महत्वपूर्ण नद्यांचे उगमस्थान आहे. सिंधू, सतलज, स्तांगपो म्हणजे ब्रह्मपुत्रा, कापी, गंडक, कोसी, इरावती, सॅल्वीन, येकॉंग, यांगत्से व हयांग या नद्या प्रामुख्याने या पठारावर उगम पावतात.
           चीन, भारत, नेपाळ भूतान, ब्रह्मदेश या देशांच्या सीमा या प्रदेशात आहे. उंच पर्वत शिखरे, उंचीवरील खिंडी, अत्युच्च पठार, मोठ- मोठ्या नद्या, गोडया व खार्या पाण्याची सरोवरे ही तिबेटच्या भूरचनेची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच चीनला तिबेट वर संपूर्ण प्रभुत्व हवे आहे. त्या द्वारे भारत आणि इतर  अशियाई देशांवर कायम दबाव निर्माण करता येईल.
       भारताच्या जम्मू – काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, सिक्किम, अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या सीमा तिबेटला लागून आहेत.  यामुळे भारतीय संस्कृतीशी या प्रदेशाची आणि लोकांची नाळ जोडली गेली आहे. स्वतंत्र देशावर १९५० ते चीनने आक्रमण करून त्याचे रुपांतर चीनच्या अखत्यारितील स्वायत्त प्रदेश असे केले. गेली अनेक दशके चीनच्या राजवटीखाली तिबेटमध्ये मानवी हक्काची पायमल्ली केली जात असल्याचे तेथील लोक सांगतात. १९५९ सालापासून तिबेटचे अधिकृत शासक चौदावे दलाई लामा हे भारताच्या धर्मशाळा या गावांमध्ये आश्रयास आहे.
             तिबेटीयन तरुणांच्या पराक्रमाचा उपयोग भारताच्या सीमा रक्षणासाठी सातत्याने झाला.  मात्र स्पेशल फायटर फोर्सची गुप्त स्वरूपाचा यंत्रणेची स्थापना करण्यात आली असल्याचे त्याची आजवर फारशी चर्चा कधी करण्यात आलेली नाही.  सुमारे तेहतीस वर्षाची सेवा न्यिमा यांनी दिली होती.  तेनसिंगच्या बलिदाना नंतर  गुप्त उपक्रमांचा अंत करून यास अधिकृत मान्यता देण्याचा संदेश भारतीय लष्कराने  या  अंतिम संस्काराच्या निमित्त्याने केला नाही.  ’भारत माता की जय’ आणि स्वतंत्र तिबेटच्या  च्या जयघोषणांनी दुमदुमत संपूर्णपणे भारतीय लष्कराच्या इतमामाने त्याला मानवंदना देत अंतिम संस्कार करण्यात आले.
या प्रसंगी शेकडो लोकांची उपस्थिती होती.
           ही घटना म्हणजे भारताने चीनला दिलेला एकप्रकारे उघड खरमरीत संदेश आहे. लडाख, गवलान, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सातत्याने काहीतरी युद्ध सदृश्य हालचाली करीत असलेल्या चिनी पीपल्स लीबेरेशन आर्मी साठी हा संदेश आहे. हे प्रदेश तर सोडाच आता तिबेटवर देखील तुम्ही आता अधिक काळ सत्ता गाजवू शकणार नाही. असाच याचा अर्थ होत आहे.
चीनच्या साम्राज्य विस्ताराच्या धोरणाला देण्यात आलेले हे एक आव्हान आहे. तिबेट स्वतंत्र असताना त्यांचा राष्ट्रध्वजावर सोनेरी सिंहाचे चित्र होते. आजही तिबेटियन नागरिक या राष्ट्र ध्वजाला आपला समजताच. भारतीय वाघ आणि सोनेरी सिंह या लाल ड्रॅगनच्या उपद्रवी हालचालींवर मर्यादा आणण्यासाठी सक्षम आहेत.
(संपर्क – ९८८१७३४८३८)

Previous Post

निसाका, रासाका सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक

Next Post

सीमेवर प्रचंड तणाव; चीनकडून गोळीबार

Next Post
संग्रहित फोटो

सीमेवर प्रचंड तणाव; चीनकडून गोळीबार

Comments 1

  1. Vaishalee H. Gupta says:
    3 years ago

    ‘Bharat Mata ki Jai’ V r proud of u all fighters who lost their lives in line of action.. Dr. SWAPNIL thank u for d unique information..even come to kno different rivers, other thn d famous onc

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींसाठी चांगला दिवस, आर्थिक लाभ..जाणून घ्या..शनिवार २ डिसेंबरचे राशिभविष्य

December 1, 2023

अजितदादांना दिला इतक्या किलोचा गुलाब पुष्प……थेट इंटर नॅशनल बुकमध्येच झाली नोंद..बघा नेमकं काय घडलं

December 1, 2023

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची मदत केव्हा मिळणार ? मुख्यमंत्र्यांनी दिली ही माहिती

December 1, 2023

घरातल्या गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही.. जयंत पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता केली ही टीका

December 1, 2023

दिंडोरीत राष्ट्रवादीचा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा

December 1, 2023

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार.. ही आहे मुदत

December 1, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.