India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बार्टीमार्फत प्रशिक्षित १४ विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत यशस्वी

India Darpan by India Darpan
August 8, 2020
in राज्य
0

मुंबई – समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत महाराष्ट्र व दिल्ली येथे यूपीएससीची पूर्वतयारी करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना प्रायोजकत्व देण्यात येते, या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या १४ विद्यार्थ्यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.

‘या सर्व भावी अधिकाऱ्यांचा मला अभिमान आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आपल्या या यशाचा व पदाचा वापर समाज, राज्य व देशाच्या हितासाठी करा याच मनस्वी शुभेच्छा’ अशा शब्दात मुंडे यांनी या सर्व भावी अधिकाऱ्यांना फेसबुक पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

अविनाश शिंदे (२२६), नवनाथ माने (५२७), अशीत कांबळे (६५१), करून गरड (६५६), सौरभ व्हटकर (६९५), अभिजित सरकाते (७११), प्रज्ञा खंदारे (७१९), निखिल दुबे (७३३), शशांक माने (७४३), सुमित रामटेके (७४८), शुभम भैसारे (७४९),  वैभव वाघमारे (७७१), संग्राम शिंदे (७८५) आणि अजिंक्य विद्यागर (७८५) अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

समाजकल्याण विभागाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) च्या वतीने यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी महाराष्ट्र व दिल्ली येथील नामांकित कोचिंग क्लासेस मध्ये तयारीसाठी प्रायोजकत्व दिले जाते. या विद्यार्थ्यांपैकी तब्बल १४ विद्यार्थ्यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या यूपीएससी मुख्य परीक्षेत घवघवीत यश संपादन केले, ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. असे  मुंडे यांनी म्हटले आहे.


Previous Post

भाजपा नगरसेवकाला सराईत गुंडाकडून धमक्या

Next Post

रनवे वर उतरताना विमान दरीत कोसळले; १७ ठार

Next Post
ट्विटरवरुन साभार

रनवे वर उतरताना विमान दरीत कोसळले; १७ ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group