नाशिक: सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय बंद असले तरी प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र १०० टक्के उपस्थित राहणे आवश्यक असल्याचा आदेश शासनाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहेत.
महाविद्यालयातील अंतीम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत अखेर निर्णय झाल्यानंतर आता सर्वच विद्यापीठामार्फत अंतिम परीक्षाच्या कामाबाबत वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत देखील एक ऑक्टोबरपासून लेखी परीक्षांना सुरुवात होणार असून १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान परीक्षा घेऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षांचे निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे .त्यामुळे प्राध्यापकांना तसेच अन्य कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती आवश्यक असल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे.