पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या अंतिम वर्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून आता प्रात्यक्षिक परीक्षा देखील पार पडला आहेत. लेखी परीक्षांसाठी आता हॉलतिकीट वितरण सुरू झाले असून विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवरून हॉलतिकीट डाउनलोड करावे लागणार आहे.
विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ऑक्टोबर पासून लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. ही परीक्षा ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात घेतली जाणार आहे. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर हॉलतिकिट उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर एक्झामिनेशन हा पर्याय निवडून त्यातील दिलेल्या लिंकच्या आधारे हॉलतिकीट डाउनलोड करता येत आहे. परीक्षा फॉर्म भरतेवेळी विद्यार्थ्यांना दिलेल्या माहितीच्या आधारे आधी लॉगिन करणे आवश्यक आहे. संबंधित माहितीची तपासणी झाल्यावर विद्यार्थ्यांना हॉलतिकीट प्राप्त होणार आहे. लॉगिन करतेवेळी आधार क्रमांक नमूद करणे अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांनी अचूक आधार क्रमांक भरावयाचा आहे. सर्व बाबींची पूर्तता केल्यावर विद्यार्थ्यांना हॉलतिकीट प्राप्त होणार आहे. अधिक माहितीसाठी व हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी www.unipune.ac.in या वेबसाईटला भेट द्या.