India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नेटरंग – या तीन अपडेटसची माहिती घेतली का?

India Darpan by India Darpan
August 24, 2020
in विशेष लेख
0

(नेटरंग – इंटरनेट आणि तंत्रज्ञानाची माहिती देणारे सदर)
वेगे वेगे धावू …
तुम्हाला वेगवान इंटरनेट म्हणजे काय अपेक्षित आहे? १५  जीबी साईजचे (4K) सिनेमे डाऊनलोड व्हायला किती वेळ लागेल?  सध्याच्या इंटरनेटच्या वेगावर जाऊ नका. संशोधकांनी आता इंटरनेटचा वेग असा शोधून काढला आहे की तुमचे डोळे पांढरे होतील. मी आत्ता उल्लेख केलेले १५ जीबी साईजचे एकदोन नव्हे , तब्बल १५०० सिनेमे तुम्ही एका सेकंदात डाऊनलोड करू शकाल असे जर मी म्हटले तर तुम्हाला खरे वाटेल काय? (एक टेराबाईट म्हणजे एक हजार जीबी !) १७८ टेराबाईट म्हणजे १,७८,००० जीबी प्रतिसेकंद.
हो, संशोधकांनी प्रति सेकंद १७८ TBPS टेराबाईट्स प्रतिसेकंद एवढ्या वेगाचे इंटरनेट शोधून काढले आहे. हे इंटरनेट वापरून असे सिनेमे एका सेकंदात डाऊनलोड करणे सहज शक्य होईल. शास्त्रज्ञांच्या मते हे तंत्रज्ञान सध्याच्या ऑप्टिकल फायबर पाइपबरोबर सहजपणे जोडून घेता येणे शक्य आहे.  सध्याचे इंटरनेट ऑप्टिकल फायबर रूट तंत्रावर चालते. नवीन तंत्रज्ञान त्यात फिट बसवणे सहज शक्य होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत उत्तमातील उत्तम इंटरनेट प्रतिसेकंद 35 टेराबाईट्स एवढा वेग  देते. नवीन इंटरनेट हे त्याच्या पाचपट वेगाने काम करेल. ह्याच्या फार तांत्रिक मुद्द्यांमध्ये मी जात नाही, परंतु भविष्यातील इंटरनेट हे कसे असेल हे लक्षात असेल. हे सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्यास वेळ लागेल हे खरेच आहे. सध्या भारतात ऑनलाइन एज्युकेशनसाठी टेराबाईट्स जाऊदे, केबीपीएस वेगामध्ये इंटरनेट चालू असलेली अनेक ठिकाणे आहेत आणि त्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित आहेत. भविष्यकाळात असे वेगवान इंटरनेट उपलब्ध झाले तर काय परिस्थिती होईल हे याची कल्पनाच केलेली बरी!
पुन्हा Whatsapp
व्हाट्सअप मध्ये काय काय सुधारणा होत आहेत हे आपण पाहिले. परंतु आता ताज्या बातमीनुसार अँड्रॉइड  फोन वापरणार्‍यांसाठी आणखी खुशखबर आहे. ग्रुप कॉल करायचे असतील तर त्यासाठी वेगळा रिंगटोन उपलब्ध होणार आहे,  जेणेकरून आपल्याला ग्रुप कॉल आला आहे हे लोकांना सहज कळावे.  स्टिकर्स ऍनिमेटेड स्वरुपात तुमच्या समोर येतील.  UI आहे म्हणजे यूजर इंटरफेस हा कॉल्सदरम्यान खूप चांगला झालेला असेल आणि आधी गायब झालेले कॅमेरा आयकॉन पुन्हा आणण्याचा निर्णय व्हाट्सअप मी घेतला आहे. हे सगळे बेटा टेस्टिंगमध्ये आहे आणि ते ग्राहकांना लवकरच उपलब्ध होईल असे वाटते.
गुडबाय IE
मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर आठवतो आहे ? तो ब्राउझर १७  ऑगस्ट २०२१  रोजी कायमचा बंद करण्यात येणार आहे. मायक्रोसोफ्ट एज या त्यांच्या नवीन ब्राउझरला एक्सप्लोररकडून ज्या काही सुविधा मिळायच्या त्याही नऊ मार्च २०२१  रोजी बंद होतील.  ब्राउझरचे जग आता खूप बदलले  आहे. क्रोम हा  सर्वाधिक वापरला जाणारा ब्राऊझर आहे. जगभरात जवळपास ६७ टक्के लोक क्रोम वापरतात. इंटरनेट एक्सप्लोरर एका अर्थाने ‘आउटडेटेड’ झाला आणि म्हणूनच मायक्रोसॉफ्टने क्रोमियम प्रणालीवरचा ‘एज’ ब्राउजर आणला.  तो अजून फार लोकप्रिय झालेला नाही.इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार हे ऐकल्यावर अनेक नेटिझन्स भूतकाळात गेले. त्याच्या आठवणी जागवल्या. काहींनी कार्टून्स काढली. इंटरनेट एक्सप्लोरर लोकांना सांगत आहे, ”अरे बाबा, मीही कधीकाळी ब्राउझर होतो ”, अशा कंमेंट्स त्यात होत्या. इंटरनेटच्या जगात काहीच शाश्वत नसते. सतत बदल हाच स्थायीभाव असतो. तुम्हाला ‘नेटस्केप ‘ ब्राउझर आठवतोय ? चांगला होता, पण आता इतिहासजमा झालाय ! असो !
– नेटकर्मी

Previous Post

माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे निधन

Next Post

ऊसतोड कामगाराचा मुलगा थेट उद्योजक (बघा ही यशोगाथा)

Next Post

ऊसतोड कामगाराचा मुलगा थेट उद्योजक (बघा ही यशोगाथा)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक… अध्यक्षपदासाठी यांच्या नावाची घोषणा…. अजित पवारांचे काय

June 10, 2023

अभिनेते धर्मेंद्र यांनी आईच्या नावाने बांधलेल्या शाळेचे पत्रे उडाले

June 10, 2023
प्रातिनिधीक फोटो

CRPFचा रंगीला जवान… १३ वर्षात केले ५ लग्न… असा झाला भांडाफोड… आता काय होणार

June 10, 2023

प्रिया प्रकाश वारियरची स्मरणशक्ती गेली

June 10, 2023

छोट्या पडद्यावर क्रांती रेडकरचे पुनरागमन

June 10, 2023

खासदाराने संसदेत केले स्तनपान….. सर्व खासदारांनी वाजविल्या टाळ्या

June 10, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group