नाशिक – एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरच्यावतीने येत्या शनिवारी (२२ ऑगस्ट) विशेष विमानसेवा दिली जाणार आहे. गणेशोत्सवास शनिवारपासून प्रारंभ होत असून यानिमित्ताने अनेकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी विमान मुंबईहून नाशिकला निघेल आणि ते ओझर विमानतळावर ५ वाजून १५ मिनिटांनी पोहचेल. त्यानंतर नाशिकहून हे विमान सायंकाळी ६ वाजता निघेल आणि सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी ते मुंबईला पोहचेल. यापूर्वीही अलायन्स एअरने नाशिक-मुंबई विमानसेवा एका दिवसासाठी दिली होती. मात्र त्यास अत्यल्प प्रतिसाद लाभला. आता मात्र, कंपनीने अधिकाधिक जनजागृती केली आहे. तसेच, गणेशोत्सवही सुरू होत असल्याने प्रवाशांचा त्यास प्रतिसाद लाभेल, असा कंपनीला विश्वास आहे. दरम्यान, कंपनीची नाशिक-हैदराबाद आणि नाशिक-अहमदाबाद ही सेवा सध्या सुरू आहे. त्याला उत्तम प्रतिसाद असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
नाशिक-मुंबई विमानसेवेचे बुकींग करण्यासाठी लिंक –
https://bookme.airindia.in/AirindiaB2C/Booking/Search