बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – दारूसाठी पैसे न दिल्याने दुकान पेटवले

by India Darpan
डिसेंबर 14, 2020 | 9:35 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

दारूसाठी पैसे न दिल्याने दुकान पेटवले
नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणातून एकाने स्पेअरपार्टसचे दुकान पेटवून दिल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री भगूर परिसरात घडली. अजय हासे (रा. भगूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी निलेश घुरीया (रा. देवळाली गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी संशयित अजय हासे याने घुरीया यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. पैसे देण्यास नकार देताच त्याने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती. तर रात्री १० वाजेच्या दरम्यान ज्वलनशिल पदार्थ टाकून दुकान पेटवून दिले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

……..

पतीची पत्नीला बेदम मारहाण      
नाशिक :  विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या घरी पहाटे जाऊन पतीने काठीने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.१३) गंगापूर रोडच्या सिरीन मेडोज कॉलनी परिसरात घडला. सुजीत सुरेश बाविस्कर (रा. ईश्‍वर प्रेस्टिज सिरीन मेडोज कॅनलरोड, गंगापूर रोड) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी पहाटे  घराचा दरवाजा वाजवून वॉचमनला उघडण्यास सांगून दरवाजा उघडताच पुढे येवून पती सुजीत बाविस्कर यांनी काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…..

पिकअप, दुचाकीची चोरी
नाशिक : शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच असून विविध भागात एक पिकअप वाहन व दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  महात्मानगर परिसरातून दीड लाख रूपये किंमतीची पिकअप वाहन चोरीला गेल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. याप्रकरणी संगीता शेटे यांनी तक्रार दाखल केली असून त्यानुसार त्यांचा चालक भूषण भामरे याने शनिवारी रात्री महात्मानगर परिसरातील बी. रोड. परिसरात पिकअप पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने पिकअप पळवून नेली. दुसर्‍या घटनेत भद्रकाली परिसरातून दुचाकी चोरीस गेल्याचा प्रकार शनिवारी (दि.१३) उघडकीस आला. याप्रकरणी अब्दुल रज्जाक कोकणी (रा. फाळके रोड, भद्रकाली) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कोकणी यांची एमएच १५ सीबी०९९२ या क्रमाकांची दुचाकी घराजवळून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

….

युवकावर चाकू हल्ला    
नाशिक : चेष्टा मस्करीतून झालेल्या वादानंतर एकाने युवकावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना पाथर्डी गावच्या साईनाथ नगर परिसरात रविवारी रात्री घडली. धनराज विठ्ठल ठिगळे (२७, साईनाथनगर) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कपील पुंडलीक मांडे (रा. साईनाथगनर, पाथर्डीगाव) याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार चौकात मुलांची चेष्ट मस्करी चालू असताना यातून वाद होऊन एकास मारहाण करण्यात आली. यामुळे चिडलेल्या धनराज याने घरातून चाकू आणून मांडे यावर हल्ला केला. यात मांडे गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…….

एकाची आत्महत्या
नाशिक : राहते घरी विषारी औषध सेवन करून एकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
अनिल पंडित आहिरे (४२, रा. दत्तनगर, पेठरोड) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आहिरे यांनी  रविवारी दुपारी राहते घराजवळ विषारी औषध सेवन केले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. परंतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चोरीसाठी आई-वडिलच मुलांना देतात चक्क भाड्याने!

Next Post

शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचे सरकारचे प्रयत्न निष्फळ – शंकर दरेकर

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचे सरकारचे प्रयत्न निष्फळ - शंकर दरेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011