नाशिक – शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात (२५ व २६ ऑक्टोबर) ५६५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ८७३ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९२ हजार २५६ झाली आहे. ८४ हजार ९२१ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ५ हजार ६९२ जण उपचार घेत आहेत.
गेल्या दोन दिवसातील नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ३१५, ग्रामीण भागातील २३७, मालेगाव शहरातील ११ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील ४, ग्रामीण भागातील १ तर जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६१ हजार ०९५. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८३८. पूर्णपणे बरे झालेले – ५७ हजार ४९४. एकूण मृत्यू – ८५७. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ७४४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.११
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २६ हजार ३६०. पूर्णपणे बरे झालेले – २३ हजार ०११. एकूण मृत्यू – ५८३.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ७६६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८७.३०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १०६. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८४८. एकूण मृत्यू – १६५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.७२
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी