शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – कांदा उत्पादक शेतकर्‍याची ५८ हजार ५०० रुपयाची फसवणूक

by India Darpan
नोव्हेंबर 20, 2020 | 2:56 pm
in क्राईम डायरी
0
crime diary 2

कांदा उत्पादक शेतकर्‍याची ५८ हजार ५०० रुपयाची फसवणूक
नाशिक – कांदा उत्पादक शेतक-याची  फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देवळा तालुक्यातील मटाणे येथील नानाजी निंबा साबळे  यांनी फिर्याद दिली असून इजियाज  अन्सारी (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अन्सारी याने नानाजी साबळे यांचा विश्वास संपादन केला व  त्यांच्याकडून २९ क्विंटल ४५ किलो कांदा २७ रुपये प्रतिकिलो प्रमाणे खरेदी केला. मात्र, प्रत्यक्षात २० रुपये प्रति किलोप्रमाणे कांदा विक्री करून ५८ हजार ५०० रुपये घेतले व ते पैसे फिर्यादी साबळे यांना न देता पळून गेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.
…….
दुचाकी चोरीचे सत्र सुरुच, तीन ठिकाणी चोरी
नाशिक – शहरातून मोटारसायकली चोरीचे सत्र सुरूच आहे. मोटारसायकल चोरीप्रकरणी गुरुवारी  विविध ठिकाणांवरून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. पहिली घटना  सातपुर औद्योगीक वसाहतीत घडली. याप्रकरणी रत्ना रविदास भौमिक (रा. पाईपलाइन रोड) यांनी  सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रत्ना यांची त्यांची ऍक्टीव्हा क्र. (एचएच ०४ झेड ०४८३) हिंद रे क्टीफायर कंपनीच्या बाहेर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. तसेच जगतापवाडी, सातपूर येथील सोनू रामसिंग सहाने यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ एफडी ११४८)  अज्ञात चोरट्याने चोरून नेली. कथडा परिसरात घडली. याप्रकरणी अहेमद सलीम शेख (रा. उपनगर) यांनी भद्रकाली पोलीस  ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख यांनी त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ एचबी ०३७०) शिवाजी चौक,  कथडा परिसरात पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली.
……..
मुंबईनाका परिसरात घरफोडी, १२ हजाराचा एेवज चोरीला
नाशिक-   घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व मोबाइल चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी मुंबईनाका परिसरात घडला. याप्रकरणी शेख फुजेश  अश्पाक (रा. नुरजहा मंजिल) यांनी  फिर्याद दिली आहे. गुरुवारी  अज्ञात चोरट्याने शेख यांच्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.  घरात  ठेवलेली १० हजार रुपयांची रोख रक्कम आणि २ हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी  मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
……..
मारहाण करत साडेतेरा हजाराचा एेवज लुटला
नाशिक – संगनमत करत तीन ते चार जणांनी मोटारसायकल चालकास मारहाण करत लुटल्याची घटना बुधवारी विनयनगर परिसरात घडली.  याप्रकरणी किशोर वाळू टिळे (रा.  चेहडी पंपींग स्टेशन) यांनी  फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १८) तीन ते चार अज्ञात संशयितांनी विनयनगर परिसरात फिर्यादी  किशोर टिळे यांची मोटारसायकल आडवून चावी काढून घेत बळजबरी करत खिशातील पाकीट व त्यातील  साडेआठ हजार रुपयांची रोकड, मोबाईल असा एकूण साडेतेरा हजार रुपयांचा माल हिसकावून घेतला. तसेच  मोटारसायकलचे नुकसान करून मारहाण केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…….
४१ हजार रुपयांची दागीने चोरून नेले
नाशिक –  सोनसाखळी चोरट्यांनी घरात शिरून वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि पाटल्या जबरदस्तीने चोरून  नेल्याची  घटना बुधवार (दि. १८) रोजी दुपारी उपनगर परिसरात घडली. याप्रकरणी वैशाली विलास धिवरे (रा. जय भवानी रोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार  रोजी दुपारी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची आई भामीली शेजवळ (रा. जय भवानी रोड) यांच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला व त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची पोत व दोन पाटल्या असे एकूण ४१ हजार रुपयांची दागीने चोरून नेले.
……..
अज्ञाताने पेटवली दुचाकी
नाशिक – अज्ञात समाज कंटकाने मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना गुरुवारी (दि. १९)  रात्री वडाळानाका परिसरात घडली. याप्रकरणी राजेश इंदराज पवार  (महालक्ष्मी चाळ, वडाळा नाका) यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांनी त्यांची  मोटारसायकल क्र. (एमएच १५ जीडी ३११०) महालक्ष्मी चाळ येथे पार्क केली होती. गुरुवारी  अज्ञात  व्यक्तीने ही मोटारसायकल पेटवून देत नुकसान केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…….
फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल लंपास 
नाशिक – फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल घेऊन तो चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार बुधवार  सायंकाळी  गंगापूर नाका परिसरात घडला.याप्रकरणी भारत बाजीराव (रा. जुना गंगापुर नाका) यांनी  फिर्याद दिली आहे. बुधवार सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खडकाळी परिसरात फोन करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात व्यक्तीने भारत यांच्याकडे मोबाइल मागीतला. त्यानंतर नजर चुकवून मोबाइल घेवून फरार झाला. भद्रकाली पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विद्यार्थी व पालकांसाठी दोन दिवसीय मोफत ऑनलाइन कार्यशाळा

Next Post

बागलाण मधील पहिल्या आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ आ. बाेरसे यांच्या हस्ते

Next Post
IMG 20201120 WA0021

बागलाण मधील पहिल्या आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ आ. बाेरसे यांच्या हस्ते

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
Screenshot 20250508 204411 Facebook 1

नाशिक महानगरपालिका पाणीवापराचे थेट स्पॉट बिलिंग देणार…या एजन्सीची नियुक्ती

मे 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011