बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकसह राज्यातील शिक्षक नेत्यांनी अनुदानाच्या मागणीसाठी घेतली बाळासाहेब थोरांताची भेट

by India Darpan
सप्टेंबर 15, 2020 | 10:46 am
in स्थानिक बातम्या
0
FB IMG 1600085285250

येवला – साहेब,आपलेच सरकार अनुदानाचा निर्णय घेईल..पण गेल्या १५ ते २० वर्षापासून आम्ही विनावेतन ज्ञानदान करतोय..आता तरी आम्हांला न्याय द्या आणि अनुदानाचा निर्णय लांबवून उपाशीपोटी ठेऊ नका अशी आर्त साद शिक्षक प्रतिनिधींनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना घातली. यावर थोरात यांनी,शाळांच्या अनुदानाच्या बाबतीत मी जोरदार प्रयत्न करीत आहे. प्रचलित नियमाने अनुदान मिळावे यासाठी मी अगोदर पासून आग्रही आहे. यावर शासन नक्कीच निर्णय घेईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
संगमनेर येथे थोरात यांची स्वाभिमानी शिक्षक संघटना,राज्य उच्च माध्यमिक व कनिष्ठ महविद्यालय कृती संघटना,कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती,मुख्याध्यपक संघ आदी शिक्षक संघटनेच्या नाशिक व राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानी भेट घेत सविस्तरपणे चर्चा केली. यावेळी विभागाचे पदवीधर आमदार डॉ.सुधीर तांबे हेही उपस्थित होते.
 संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यानी आपल्या १३ सप्टेंबर २०१९ मधील मुद्यासह प्रामुख्याने १५ नोव्हेंबर २०११ तसेच २६ जून २०१४ च्या शासननिर्णयाप्रमाणे सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळा व ज्यू.कॉलेजांना अनुदान वितरित करण्याचे सुत्र लागु करणे गरजेचे असल्याचे पुराव्यासह निदर्शनास आणून दिले.
यावेळी थोरात म्हणाले, शाळांच्या अनुदानाच्या बाबतीत मी माझ्यातर्फे जोरदार प्रयत्न करीत आहे. प्रचलितने अनुदान मिळावे यासाठी मी अगोदर पासून आग्रही असून उपाशीपोटी काम करणाऱ्या अन अडचणीत शिकविणारा शिक्षकाला पूर्ण वेतन मिळायलाच पाहिजे. यासंदर्भात निर्णयासाठी केलेल्या उपसमितीमध्ये अजून इतर दोन पदांची नावे आलेली नाहीत. समिती पूर्ण स्थापित झाल्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल. अनुदानाच्या प्रश्ना बाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडसह आम्ही सर्व आग्रही आहोत असेही त्यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशन २०१९ मध्ये मी टप्पा पद्धतीने अनुदान वितरित केले जाईल असे  सांगितले होते. ते परिपूर्तीकडे नेण्याचा माझा उपसमितीच्या माध्यमातून प्रयत्न राहिल असेही ते म्हणाले. यावेळी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नाशिक मुख्याध्यापक संघाचे एस.बी.देशमुख, शिक्षक नेते के.पी.पाटील,भारत भामरे, कृती समितीचे नेते गोरख कुळधर,सोमनाथ जगदाळे,अशोक जाधव,उच्च माध्यमिक कृती संघटनेचे राज्याध्यक्ष दीपक कुलकर्णी,राज्य सचिव अनिल परदेशी,प्रवीण भुतेकर,कर्तारसिंग ठाकूर,दिनेश पाटील,गुलाब साळुंखे,निलेश गांगुर्डे,महेंद्र बच्छाव,पी. एन. तायडे,विशाल आव्हाड,सुरेश कापूरे,प्रमोद रुपवते, संदीप बाविस्कर आदी उपस्थित होते.
अनुदानाच्या प्रतीक्षेत ५० हजारांवर शिक्षक
शासनाने प्रचलित पद्धतीने अनुदान दिले तर आज वयाची चाळीशी उलटलेले शिक्षकांना वेळेत पूर्ण वेतन मिळणर आहे.आजही अनुदानाच्या प्रतीक्षेत ५० हजारांवर शिक्षक वर्षानुवर्षे अध्यापन करत असून त्यांना न्याय द्या,उपाशी ठेऊ नका हि मागणी आम्ही सर्वांनी केली.शासन अनुदानाच्या निर्णयावर सकारात्मक असल्याचे सर्वच मंत्रीमहोदय सांगत आहेत.आता ठोस निर्णय घेऊन अनुदान खात्यावर टाकून आम्हांला न्याय मिळावा.”
–गोरख कुळधर,माध्यमिक शिक्षक संघटना नेते,येवला.
FB IMG 1600085296828
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लूटालूट! सिटीस्कॅनसाठी तब्बल १० हजार रुपये

Next Post

कांदा निर्यातबंदी रद्द करा, खा. भारती पवार यांची लोकसभेत मागणी ( vdo )

India Darpan

Next Post
20200915 162711

कांदा निर्यातबंदी रद्द करा, खा. भारती पवार यांची लोकसभेत मागणी ( vdo )

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011