बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या डिप्लोमा विद्यार्थ्याने केले ‘हे’ उद्योग; मुंबई पोलिसांकडून अटक

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2020 | 1:15 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


मुंबई – डिप्लोमा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या एका युवकाचे मोठे कारनामे मुंबई पोलिसांमुळे उघड झाले आहेत. हा युवक अनेकांना गंडवत असल्याचे समोर आले आहे. त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी (एनआयए) अधिकारी म्हणून काम करत असल्याचे भासवणाऱ्या २५ वर्षांच्या युवकाला पोलिसांनी अटक केली. दक्षिण मुंबईतील २१ वर्षीय महिलेला त्याने फसवण्याचा प्रयत्न केला. या आरोपाखाली गामदेवी पोलिसांनी नाशिकहून हर्षद सपकाळ या तरुणाला अटक केली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तक्रार दिली.

गामदेवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) डिप्लोमा असणारा हर्षद सपकाळ याने एनआयए अधिकारी म्हणून काम करीत असल्याचे सांगत वेबसाइटवर एका महिलेला लग्नाचा प्रस्ताव सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाठविला होता. त्या महिलेने प्रत्युत्तर दिले, त्यानंतर दोघांनी गप्पा मारण्यास सुरवात केली आणि सेलफोन नंबरची देवाणघेवाण झाली. विश्वास संपादन करण्यासाठी सपकाळ याने त्या महिलेला त्याच्या ओळखपत्राची छायाचित्रे आणि एनआयएच्या गणवेशातील छायाचित्रेही पाठविली. मात्र, या महिलेला शंका आल्याने तिने एनआयएला पत्र पाठविले. त्याने दिलेले ओळखपत्र व फोटोही पाठविले. त्यानंतर एनआयने खात्री केली असता कुठलाही व्यक्ती एनआयए मध्ये नोकरीला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना तक्रार दिली. अशी माहिती गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढला. तोतयागिरी करून फसवणूक करणे, सरकारी सेवक असल्याचे खोटे सांगणे याद्वारे भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणूक आणि बनावटपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी नाशिकमध्ये सपकाळला शोधले. त्याचा फोन काही दिवस बंद होता, ज्यामुळे आम्ही त्याचा शोध घेऊ शकलो नाही. मात्र, बुधवारी रात्री आम्हाला कळले की तो नाशिक येथे आहे. त्यामुळे पोलिसांचे एक पथक नाशिकलाच होते. हर्षद नाशिकला घरी येताच पोलिसांनी त्याला पकडले.  चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. अटक केल्यानंतर सपकाळने त्वरित गुन्ह्याची कबुली दिली. सपकाळच्या राहत्या घरातून बनावट ओळखपत्र, अनेक आयुक्तालय आणि उपविभागीय कार्यालयांचे डुप्लिकेट रबर स्टॅम्प आणि एनआयएचे गणवेश जप्त करण्यात आले आहेत.

सपकाळला यापूर्वी एकदा अटक करण्यात आली आहे. एका सिनेमात भूमिका मिळाण्याच्या बहाण्याने त्याने नाशिकमध्येच एकाला ९ लाख रुपयांना फसवले होते. त्याच्याविरोधात नाशिकमध्ये बलात्काराचाही एक गुन्हा दाखल आहे. तसेच जालना येथील एका फसवणूकीच्या प्रकरणात त्याला अटक झाल्याचे मोहिते म्हणाले. सपकाळ याला न्यायालयात हजर केले असता, त्याला २४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगाई यांचे निधन

Next Post

संपूर्ण राज्याकरिता एकात्मिक बांधकाम नियमावली; राज्य सरकारचा निर्णय

India Darpan

Next Post

संपूर्ण राज्याकरिता एकात्मिक बांधकाम नियमावली; राज्य सरकारचा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011