India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकचे पाणी महाराष्ट्रालाच; भुजबळ यांची ग्वाही

India Darpan by India Darpan
August 24, 2020
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – गेल्या काही काळात गोदावरी खोऱ्याचे पाणी गुजरातच्या प्रकल्पांना देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची तहान भागविणे आवश्यक आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पाणी महाराष्ट्राच्या बाहेर न जाऊ देता त्याचा फायदा महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कळमुस्ते प्रवाही वळण योजना, वैतरणा मुकणे वळण योजना उर्ध्व कडवा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधिक्षक अभियंता व प्रशासक अरुण नाईक, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, नाशिकचे अधिक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता आर. ए. शिंपी आदी उपस्थित होते.

महिन्याभरात संकल्पचित्र सादर करा

भुजबळ म्हणाले की, प्रवाही वळण योजना कळमुस्ते ही योजना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते शिवारातील डोंगरगाव या गावाजवळील दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. गोदावरी व तापी खोऱ्यातील उपलब्ध पाण्याचा पूर्णपणे वापर झाला असल्यामुळे औरंगा, अंबिका, नारपार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा खोऱ्यातील नद्यांचे पाणी अरबी समुद्रात वाहून जात होते. त्यामुळे गोदावरी व तापी खोऱ्यात वळविण्याचा अभ्यास समन्वय समितीमार्फत करण्यात आला. त्यानुसार १९ प्रवाही वळण योजनेद्वारे २३२१ द.ल.घ.फु. पाणी नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात उपलब्ध होणार आहे. यामध्ये कळमुस्ते ही मोठी वळण योजना असून याद्वारे दमणगंगा खोऱ्यातील ६९०.१६ द.ल.घ.फु./ १९.५४ दलघमी पाणी गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याचे नियोजन असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडीजवळ बांधण्यात येणाऱ्या कळमुस्ते धरणाचे संकल्पचित्र महिन्याभरात पूर्ण करुन शासनाला सादर करण्याची सूचना मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेच्या अधिकाऱ्यांना यावेळी भुजबळ यांनी केली.


Previous Post

निळवंडे धरणाचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिला का?

Next Post

व्यापारी उद्योजकांना प्रत्यक्ष मदत गरजेची; संतोष मंडलेचा यांची मागणी

Next Post

व्यापारी उद्योजकांना प्रत्यक्ष मदत गरजेची; संतोष मंडलेचा यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्हायरल व्हिडीओ; रस्त्यावर लावलेली दुचाकी रात्री जेव्हा अचानक सुरू होते (बघा व्हिडिओ)

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group