India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

“धामडकीवाडी पॅटर्न”ने मनामनात रुजली शाळा; इगतपुरी तालुक्यातील अनोखा प्रयोग यशस्वी

India Darpan by India Darpan
August 17, 2020
in संमिश्र वार्ता
0

प्रमोद परदेशी या शिक्षकाच्या प्रयत्नांना अतिदुर्गम भागात यश
इगतपुरी – बिनरस्त्याचे गाव… फोन नेटवर्कचा पत्ताच नाही… अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या धामडकीवाडीत मात्र शिक्षणाचा अनोखा पॅटर्न यशस्वी झाला आहे. प्रमोद परदेशी या शिक्षकाने घेतलेल्या पुढाकारामुळे या वाडीतही शिक्षणाची गंगा वाहत आहे.
कोरोनामुळे सर्वच क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाला असल्यामुळे शाळांमध्ये वाजणारी घंटा वाजू शकलेली नाही. अतिदुर्गम भागात आधीच शिक्षणापासून फारकत घेणारे विद्यार्थी असतांना त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी त्यापैकीच. भावली धरणाच्या बाजूला  रस्त्यापासून १ किमी दूर असलेल्या ह्या वाडीत पायपीट करूनच खाचखळग्यांच्या रस्त्याने जावे लागते. १ ते ४ पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून एकूण २१ विद्यार्थी पटावर आहेत. मुख्याध्यापक प्रमोद परदेशी आणि सहकारी शिक्षक दत्तू निसरड हे दोघे काम पाहतात.
आदिवासी अतिदुर्गम भागातील शाळा असल्याने येथील २१ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दूरगामी परिणाम व्हायला कोरोना कारणीभूत ठरला. यामुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाण्याचा मोठा धोका होता. प्रमोद परदेशी यांनी काळाची पावले ओळखून लॉकडाऊन काळात पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित विविध व्हिडिओंची निर्मिती केली. स्वाध्याय आणि गृहपाठासाठी प्रश्नावली तयार करून त्याच्या हजारो प्रिंट सुद्धा केल्या. मात्र कोरोनाचा कहर वाढल्याने राज्यभर शाळा बंद आणि ऑनलाईन शिक्षणाचा डंका पिटला गेला. ऑनलाईन शिक्षण देण्याची प्रखर इच्छा असूनही धामडकीवाडीत कोणत्याही फोनला तसूभरही नेटवर्क नाही आणि वाडीत कोणाकडे स्मार्ट फोनही नसल्याने काय करावे ह्याची विवंचना होती.
शिक्षणात कोणताही खंड पडू नये यासाठी परदेशी यांनी डगमगून न जाता वेगळा प्रयोग करण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्यांनी पिंप्री सद्रोद्दीन येथील जुने केबल व्यावसायिक अमजद पटेल यांची भेट घेतली. धामडकीवाडीतील प्रत्येक घरातील टीव्हीवर शाळेचा अभ्यासक्रम कोणत्या मार्गाने प्रसारित होईल यांचा विचार केल्यानंतर टाकाऊ म्हणून पडलेले व्हीसीआर आणि इतर तत्सम यंत्रसामुग्री संकलित केली. शाळेमध्ये मुख्य प्रसारण केंद्राची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्यात आली. ह्यामध्ये यश आल्यानंतरही अडचणी सुटल्या नाहीत. ह्या संपूर्ण आदिवासी वाडीमध्ये फक्त ३ टीव्ही संच आणि त्यातही २ बंद अवस्थेत होते. अमजद पटेल यांच्या मदतीने बंद टीव्ही संच दुरुस्त करून त्यांच्यापर्यंत प्रसारण केबल जोडण्यात आली. अनेक संकटांचा सामना करून अखेर अभ्यासक्रम आधारित व्हिडीओ प्रसारण करण्यासाठी प्रमोद परदेशी यांच्या संकल्पनेतील “धामडकीवाडी पॅटर्न” आकाराला आला. अभिनव अजमेरा व पेहचान प्रगती फाउंडेशनच्या प्रगती अजमेरा यांनी “धामडकीवाडी पॅटर्न” साठी आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य केले.
परदेशी यांनी तयार केलेले अभ्यासक्रम आधारित शैक्षणिक व्हिडिओ महिनाभरापासून सकाळी १० वाजता शाळेतील प्रसारण केंद्रात लावण्यात येत आहेत. यावेळी टीव्हीवर अन्य कोणताही चॅनेल सुरू असेल तर तो आपोआप बंद होतो. सर्व विद्यार्थ्यांना याबाबतच्या सूचना स्वयंसेवक बबन आगीवले, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ आगीवले यांच्यामार्फत घरपोच देण्यात येतात. एका टिव्हीपुढे ७ विद्यार्थी असे तिन्ही टिव्हीपुढे २१ विद्यार्थी एकाचवेळी शिक्षणाचे धडे गिरवतात. यासोबतच घरातील अन्य सदस्यांचेही आपोआप शिक्षण होऊन जाते. त्याच दिवशी केलेल्या अभ्यासासाठी गृहपाठ आणि स्वाध्यायसाठी प्रिंट्स दिल्या जातात.
रोजच्या नियोजनानुसार परदेशी हे स्वतः पदरमोड करून हजारो रुपयांचा कागदांसाठी खर्च करतात. अभ्यासाचे प्रसारण सायंकाळी सुद्धा काही वेळ करण्यात येते. टिलिमिली कार्यक्रम सुद्धा याद्वारे प्रसारित करण्यात येतो. यामध्ये अभ्यासाशिवाय महापुरुषांवरील संदेश देणारे चित्रपट, कार्टून कथा, गप्पा आदींमुळे सुद्धा विद्यार्थी टिव्हीपुढून उठत नाहीत.
परदेशी व निसरड हे दोघे शिक्षक नियमित धामडकीवाडीत घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. यासह पालकांशी फोनवरून चर्चा, स्वाध्यायासाठी आवश्यक अध्ययनसाहित्य वितरण, आरोग्यविषयक प्रबोधन करत असतात. “धामडकीवाडी पॅटर्न”मुळे येथील आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाचा अखंड फायदा घेत असल्याने मजुरी करणारे पालक समाधानी झाले आहेत.
अडचणींचा डोंगर कधी होणार दूर ?
“धामडकीवाडी पॅटर्न” विद्यार्थीप्रिय आहे. मात्र सतत होणार विजेचा लपंडाव अडथळा करीत आहे. यासह मोबाईलला नेटवर्क नाही. गरिबीमुळे घरात टीव्ही नसल्याने अनेकांना ३ टिव्हीचा उपयोग नाईलाजाने करावा लागतो. सामाजिक क्षेत्रातील नागरिकांकडून कालबाह्य झालेले आणि कोनाड्यात पडलेले टीव्ही उपलब्ध झाल्यास “धामडकीवाडी पॅटर्न” राज्यभर आपला वेगळा ठसा उमटवू शकेल.
मदतीचा ओघ
जलसंधारण मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी हरिभाऊ गीते यांनी स्पर्शविरहीत सॅनिटायझर यंत्र शाळेला दिले आहे. बर्फानी फार्मातर्फे थर्मोमीटर यंत्र आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मुबलक मास्क मिळाले आहेत. धामडकीवाडी शाळा कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आणि शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी सज्ज आहे.
—
■ शिक्षणात खंड पडल्यास चिमुकले विद्यार्थी नकारात्मकतेकडे वळण्याचा मोठा धोका होता. त्यांना अखंडितपणे शिक्षणाचा फायदा मिळवून देण्यासाठी सूत्रबद्ध नियोजन केले. “धामडकीवाडी पॅटर्न” साठी एका शब्दावर मदत करणाऱ्या अभिनव अजमेरा, प्रगती अजमेरा, जैन उन्नती ग्रुप,  अमजद पटेल आणि गावकरी यांचे मी आभार मानतो.
– प्रमोद परदेशी, मुख्याध्यापक, धामडकीवाडी
■ टीव्हीवरची शाळा आणि प्रत्यक्षातील शाळा यामध्ये फरक नाही. शाळेत जे प्रत्यक्ष शिकवतात अगदी त्याच प्रकारे शिक्षण मिळत आहे. बाल चित्रपट, टिलिमिली, गृहपाठ आदींमुळे आम्ही जणू काही शाळेतच असल्याचे आम्हाला वाटते.
– रेश्मा आगीवले, विद्यार्थिनी इ. ४ थी
■ शिक्षकांकडून आमच्या पालकांसोबत नियमित चर्चा, भेटी, आढावा यामुळे आम्ही घरातील टीव्हीवरची शाळा आनंदितपणे अनुभवत आहे. आमचे पालकही यानिमित्ताने शाळेचा जाण्याचा आत्मिक आनंद घेत आहेत.
– विजय आगीवले, विद्यार्थी इ. ४ थी


Previous Post

चांदवडला कांदा रोपावर अज्ञाताने ताणनाशक फवारले, दोन लाखाचे नुकसान

Next Post

भिवतास धबधब्याची मोहिनी; हा व्हिडिओ पाहून तुमचीही पावले तिकडे वळतील

Next Post

भिवतास धबधब्याची मोहिनी; हा व्हिडिओ पाहून तुमचीही पावले तिकडे वळतील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 3, 2023

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group