India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

देशात आता ‘राष्ट्रीय डिजीटल आरोग्य अभियान’; प्रधानमंत्री मोदींची घोषणा

India Darpan by India Darpan
August 16, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज (१५ ऑगस्ट) ‘राष्ट्रीय डिजीटल आरोग्य’ अभियानाची घोषणा केली. या अभियानाअंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आरोग्याविषयक इतिहासाचा तपशील एकाच वेळी उलपब्ध व्हावा यासाठी डिजीटल आरोग्य ओळखपत्र दिलं जाणार आहे.

देशाच्या चौऱ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य समारोह आज नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पार पडला. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, देशाला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. या अभियानामुळे देशाच्या आरोग्यक्षेत्रात मोठी क्रांती घडून येईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. देशानं प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला हवं, आपल्या विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून आपण देश तसंच आंतरराष्ट्रीय बाजारासाठी उत्पादनं बनवायला हवीत असं ते म्हणाले. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेतकऱ्यासह संपूर्ण कृषी क्षेत्र आत्मनिर्भर करण्याला प्राधान्य दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. यादृष्टीनं कृषी क्षेत्राकरता आधुनिक पायाभूत सुविधा उभारता याव्यात याकरता एक लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा निधी उभारला असल्याचं त्यांनी सांगितलं.

आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. हे लक्षात घेऊनच ३० वर्षांनंतर देशाचं नवं शैक्षणिक धोरण आणलं आहे. या धोरणामुळे जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आत्मनिर्भर भारतात डिजीटल इंडियाची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचं ते म्हणाले. २०१४ पर्यंत देशातल्या केवळ ५ डझन ग्रामपंचायती फायबर ऑप्टीक्सनं जोडल्या होत्या, मात्र गेल्या पाच वर्षात दीड लाख ग्रामपंचायती फायबर ऑप्टीक्सनं जोडल्या गेल्या अशी माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय छात्र सेनेचा देशाच्या सीमाभागापर्यंत विस्तार करण्याचा मनोदयही प्रधानमंत्र्यांनी आज व्यक्त केला. याअंतर्गत सुमारे एक लाख छात्रसैनिकांना प्रशिक्षण देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या तीन लसींचं काम सुरु आहे. वैज्ञानिकांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर या लसींचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जाईल, तसंच देशातल्या प्रत्येकाला लस मीळेल अशा रितीनं नियोजनही केलं आहे असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. नेपाळचे प्रधानमंत्री के.पी.शर्मा यांनी देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय आणि सरकारला शुभेच्छा दिल्या आहे.

आज त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी वरून आपल्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीचे अस्थायी सदस्यत्व मिळाल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले.  ७४वा स्वातंत्र्य दिन आज राज्यासह देशभरात हर्षोल्हासात साजरा होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करत स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम होत आहेत.


Previous Post

त्र्यंबकला ९१ जणांची कोरोनावर मात; भीती हळूहळू कमी

Next Post

तो क्षण आलाच! महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहतेही झाले भावूक

Next Post

तो क्षण आलाच! महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहतेही झाले भावूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी किती निधी मिळाला? कुठले मार्ग होणार?

February 2, 2023

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group