देवळा – येथील प्रसिद्ध कांदा व्यापारी आणि देवळा मर्चंट बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र (भालुदादा) विनायक कोठावदे (वय ९३ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. देवळा लाडशाखीय वाणी समाजाचे ते माजी अध्यक्ष होते. तसेच, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांचा अंत्यविधी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता देवळा अमरधाम येथे होईल. अंत्ययात्रा विठेवाडी रोड पाण्याच्या टाकीजवळील त्यांच्या राहत्या घरापासून निघेल.