बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देवळा – बनावट मुद्रांक प्रकरणी गुन्हा दाखल, मजकुराशी छेडछाड करून बनावट दस्तऐवज

by India Darpan
फेब्रुवारी 14, 2021 | 5:43 am
in स्थानिक बातम्या
0
mudrank office

देवळा : बनावट दस्तऐवज प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात बापू रामचंद्र वाघ, मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ व इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मेशी येथील जमीन खरेदीप्रकरणी जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी तपासकामात अडथळा येऊ नये म्हणून १० फेब्रुवारी रोजी देवळा येथील  दुय्यम निबंधकांचा पदभार काढून घेतला होता. त्यानंतर संबधीतावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रभारी दुय्यम निबंधक माधव  महाले  यांनी फिर्याद दिली. त्यानंतर हे गुन्हे दाखल झाले आहे.

या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की,  देवळा येथील अभिलेख कक्षातून मुद्रांक विक्रेता चंद्रकांत वाघ याने दुय्यम निबंधक कार्यालय येथून अधिकारी व कर्मचारी यांच्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन विश्वास संपादन केला. त्यांची नजर चुकवून दस्त क्र १७८७/२०१२ ची झेरॉक्स कॉपी कार्यालयाचे अभिलेख कक्षातून मालमत्ता हस्तांतरित करता यावी या उद्देशाने काढून घेतली. त्यातील मजकुराशी छेडछाड करून बनावट दस्तऐवज तयार केला. नंतर तो दुय्यम निबंधक कार्यालय देवळा येथील अभिलेख कक्षात परत ठेवून दिला.  त्यानंतर बापू रामचंद्र वाघ यास अर्ज लिहून देऊन बनावट दस्तऐवज असल्याचे माहीत असतांनाही मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू वाघ याने मेशी (ता. देवळा) शिवारातील मिळकत ४००/१ क्षेत्र तीन हेक्टर ५० आर क्षेत्र हे बापू रामचंद्र वाघ याच्या नावे फेरफार नोंदी करून शासनाची तसेच मूळ जमीन मालक भास्कर धर्मा निकम ( रा.तीसगाव ता.देवळा) यांची फसवणूक केली.

सदर फिर्यादीवरून देवळा पोलिसात फसवणुकीसह ४०६,४६७, ४६८,४७१, ३४ तसेच भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाणी भरण्यास गेलेल्या अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा विहिरीत बुडून मृत्यू

Next Post

राम मंदिरासाठी जमा झाले १५०० कोटी; अनेकांकडून मोकळ्या हाताने दान

India Darpan

Next Post
ram mandir

राम मंदिरासाठी जमा झाले १५०० कोटी; अनेकांकडून मोकळ्या हाताने दान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011