नाशिक – शहरात सायकलिस्टचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्याच्या दृष्टीने बहुतांश जण सायकल चालविण्यास प्राधान्य देतात. अशा सायकल प्रेमींसाठी नाशिक शहर सायकल फ्रेंडली बनण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे.
‘इंडिया सायकल फॉर चॅलेंज’ अंतर्गत सायकल प्रेमींना यात सहभागी होता येणार आहे.यासंदर्भात सायकलींगबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियेसाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. शहरात सायकलिंग करतांना भेडसावणाऱ्या समस्या नोंदवता येणार आहे. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत सायकलिंगसाठी अनोख्या संकल्पना अमलात आणण्यासाठी नागरिकांचे मत जाणून घेतले जात आहे. याद्वारे सायकलप्रेमींच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असून त्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत उपाययोजना केल्या जाणार आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नाशिक स्मार्ट सिटी कडून करण्यात येत आहे.
खालील लिंकवर सर्वेक्षणाची सर्व माहिती उपलब्ध असून त्यावर आपले मत नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
https://bit.ly/NashikCycles4Change