पालकमंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन
नाशिक – तळागाळातील नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना योग्य न्याय द्या, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ फार्म येथे आयोजित केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर यशवंत उमेदवार सुमित जगताप (रँक ५०७), अंकिता वाकेकर (रँक ५४७) व स्वप्निल पवार (रँक ६३५) गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री भुजबळ म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा अतिशय कठीण परीक्षा असते प्रचंड सामान्य ज्ञान व विविध विषयांचा अभ्यास करून पास होतात. या देशाचे प्रशासन चालविण्याचे काम करत असतात मुख्य भूमिका बजावत असतात. नागरिकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नांची कायद्याच्या चौकटीत राहून सोडवाव्यात. सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे लागते, त्या सर्वांना लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीनं अभिमान वाटावी अशी ही बाब आहे. पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाल व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर तसेच उत्तीर्ण विद्यार्थी सुमित जगताप, अंकिता वाकेकर, स्वप्निल पवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.