बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ट्रम्प महाभियोग प्रस्ताव : आता पुढे हे होणार?

by India Darpan
जानेवारी 16, 2021 | 5:53 am
in संमिश्र वार्ता
0
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंग्टन –  अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यात कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. कारण याच दरम्यान ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने समर्थकांकडून कोणतीही गडबड किंवा गोंधळ होऊ नये, यासाठी सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राजधानी इमारतीच्या सभोवताल कुंपण घालण्यासह सर्व कडक बंदोबस्ताची व्यवस्था केली गेली आहे.  यावेळी हजारो नॅशनल गार्डचे जवान तैनात असतील. हा सोहळा राजधानी वॉशिंग्टनच्या वेस्ट फ्रंटमध्ये २० जानेवारीला होईल.  लेडी गागा राष्ट्रगीत गातील, तर जेनिफर लोपेझ हे संगीत सादर करतील.
दरम्यान, अमेरिकेच्या संसदेवर हल्ल्याबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध बुधवारी महाभियोग प्रस्ताव पारित करण्यात आला. रिपब्लिकन पार्टीतील ट्रम्पचे समर्थक असलेल्या काही खासदारांनी त्यांची साथ सोडली आहे. दहा रिपब्लिकन खासदारांनीही या ठरावाच्या बाजूने मतदान केले. तो ठराव डेमोक्रॅटिक पक्षाच्या बहुमतासह संसदेचे कनिष्ठ सभागृहात मंजूर झाला. ट्रम्पवर संसदेवर हल्ला करण्यासाठी जमावाला भडकवण्याचा आरोप या प्रस्तावात करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी कॅपिटल, संसद संकुलावर त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला.  महाभियोगमुळे ट्रम्प यांना अध्यक्षपदावरून हटविल्यास कोणतीही घटनात्मक पद सांभाळण्यासाठी त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

आता पुढे काय होईल?
१- प्रतिनिधी सभागृहातून मंजूर केलेला ठराव संसदेचे वरिष्ठ सभागृह सिनेटला पाठविला जाईल.
२- यानंतर, १०० सदस्यांच्या सिनेटमधील बहुसंख्य नेते महाभियोगाची प्रक्रिया सुरू करतील.
३- शपथविधीच्या तयारीमुळे सिनेट अधिवेशन १९ जानेवारीपर्यंत होणार नाही.
४- ट्रम्प यांच्या कार्यकाळात सिनेटमध्ये महाभियोग येण्याची शक्यता कमी आहे.
५ – महाभियोग सिनेटमध्ये गेला तर तेथे दोन तृतीयांश बहुमत पार करावे लागेल.
६-रिपब्लिकन पक्षामध्ये ट्रम्प यांचा विरोधही वाढला असल्याचे यातून दिसून येते.  तथापि, रिपब्लिकन कोणत्याही स्थितीत ट्रम्प यांच्याविरोधात मतदान करण्याची स्थिती सिनेटमध्ये स्पष्ट नाही.
७- यापुर्वी प्रतिनिधी सभागृहात ट्रम्पविरोधात पदाचा गैरवापर केल्याबद्दल डिसेंबर २०१९ मध्ये महाभियोग आणण्यात आला होता.  पण नंतर हा महाभियोग रिपब्लिकन पक्षाच्या बहुसंख्य मतांमुळे सिनेटमध्ये अयशस्वीला. आता त्यांच्या कार्यकाळात फक्त सहा दिवस शिल्लक असताना केवळ एका वर्षात दुसर्‍या वेळी महाभियोग चालविला जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिंदे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची मुजोरी कायम; कुरापत काढून ट्रक चालकाला मारहाण

Next Post

काय सांगता? कोरोनावरील लसीमुळे होणार हे साईड इफेक्ट्स?

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

काय सांगता? कोरोनावरील लसीमुळे होणार हे साईड इफेक्ट्स?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011