बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गुरुजींसाठी सोशल चळवळ: ‘मी शिक्षक-मी मदत करणार’ग्रुपद्वारे अनेकांना मदत 

by India Darpan
सप्टेंबर 18, 2020 | 9:13 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200918 WA0011

मुकुंद बाविस्कर, नाशिक
एखाद्याला आपण उजव्या हाताने मदत केली तर डाव्या हाताला देखील कळू नये असे म्हटले जाते. सध्या कोरोनामुळे अनेकांची धूळधाण झाली आहे. कुणाचा रोजगार गेला तर कुणाचा पगार बंद झाला. परंतु हजारो मदतीचे हात देखील धावून आले. वेतन नसलेल्या गुरुजींच्या मदतीसाठी त्यांच्या व्यवसायातील बंधू धाऊन आले आहेत. ही सोशल चळवळ त्यामुळेच सध्या चर्चेची बनली आहे.
आपल्या जीवनात सुसंस्काराचे बीज रोवणारे किंबहुना जीवन घडविण्यात गुरुजनांचा खूप मोलाचा वाटा असतो. मग तो शिक्षक प्राथमिक शाळेतील असो की महाविद्यालयातील असो. थोर समाजसेवक साने गुरुजी  त्यांनी देखील गुरुजनांची महती वर्णन केली आहे. शिक्षक असो की प्राध्यापक त्यांचा शिक्षण क्षेत्रात त्याग मोलाचा असतो. परंतु केवळ त्यागावर पोट भरत नाही. घर- संसार चालवण्यासाठी पैसा लागतो. मात्र कोरोनामुळे पाच ते सहा महिन्यापासून शाळा -महाविद्यालय बंद असल्याने अनेक शिक्षक व प्राध्यापकांचे पगार बंद आहेत. विशेषतः विनाअनुदानित शिक्षकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. काहींच्या तर घरातील किराणा देखील संपला होता. तर अनेकांचे घरभाडे थकले होते. अशावेळी त्यांच्या व्यवसायातील शिक्षकच मदतीला धावून आले.
एचपीटी महाविद्यालयामधील प्रा. डॉ. रामदास भोंग, प्रा. अजय अहीर, प्रा. यशवंत साळुंखे, प्रा. रमेश शेजवळ, प्रा. रमेश गिरी आदींसह अन्य सहकाऱ्यांनी एकत्र येत ‘मी शिक्षक -मी मदत करणार’ असा व्हाट्सअप ग्रुप तयार केला. त्याला जिल्हाभरातील पगारी शिक्षक आणि प्राध्यापकांनी प्रतिसाद देत मदत दिली. परंतु सदर मदत गोळा करताना मदत घेणाऱ्याचे नाव मुद्दामच सांगण्याचे किंवा जाहीर करण्याचे टाळले. जेणेकरून मदत घेणाऱ्या शिक्षकांचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये.
आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, प्राध्यापक, प्राध्यापक, कामगार मजूर आदींसह विविध क्षेत्रातील सुमारे साडेचार हजार लोकांना या ग्रुपच्या माध्यमातून मदत करण्यात आली. साधारणतः  प्रत्येकी हजार रुपये पासून ते चार हजार रुपयांपर्यंत ही मदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी, कामगार, परप्रांतीय मजूर, छोटे व्यावसायिक, वाड्या पाड्या वरील आदिवासी बांधव यांना देखील औषधी, मास्क, किराणा, कपडे आदींचे वाटप या ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
IMG 20200918 WA0010 IMG 20200918 WA0009
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोनाबाधित

Next Post

भारत-चीन तणाव भाग ३ – तोंड दाबून बुक्क्यांचा मार

India Darpan

Next Post
IMG 20200918 WA0006

भारत-चीन तणाव भाग ३ - तोंड दाबून बुक्क्यांचा मार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011