India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गर्दीच्या ठिकाणी गणेशोत्सवास मनाई

India Darpan by India Darpan
August 3, 2020
in Uncategorized
0

पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
नाशिक – रेल्वे स्थानक, बसस्थानक, रिक्षा स्टँड, प्रमुख हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था अशा गर्दीच्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली जाणार नाही. आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना कोरोना आणि संसर्गजन्य परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक आहे. उत्सव आनंदाने साजरे करा, मात्र हा उत्सव साजरा करतांना नियम व अटींचे पालन करुन शांतता भंग न होतात भक्तीभावाने साजरा करावा. तसेच या उत्सवातून कोरोनापासून बचाव कसा करता येईल याबाबत जनजागृतीवर भर दिल्यास खऱ्या अर्थी गणेशोत्सवाचे फलीत होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या उद्देशाने आयोजित बैठकीत भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या काळात आलेल्या सण उत्सव आपण गर्दी न करता साजरे केले. आद्यपही कोरोनाचा धोका कायम असून, रुग्ण वाढत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमावलीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊननंतर जिल्ह्यात रुग्ण संख्या अधिक वाढली असल्याने गणेशोत्सव साजरा करतांना काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे.
परवानगी सहज मिळणार
नाशिक शहरात एकूण ७५० सार्वजनिक मोठी मंडळे असून किमान दीड लाखांहून अधिक घरघुती गणेश मंडळे असून या सर्व मंडळांनी सहकार्याची भूमिका दाखविली आहे. गणपती मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी ४ फूट, घरगुतीसाठी २ फूट असावी आणि मंडप उभारणीबाबतच्या सूचना शासनाकडून येतील त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. गणेशोत्सवासाठी यंदा करण्यात आलेले नियम हे याच वर्षांपूरते मर्यादित असतील पुढील वर्षी हीच नियमावली लागू राहणार नाही. तसेच गणेशोत्सवासाठी परवानगी सहज उपलब्ध करून देण्यात याव्यात असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक मंडळाच्या आरतीसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी स्वत:रोखावे ज्याने करुन कोरोनाला अटकाव करण्यास मदत होईल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती मुर्त्यांच्या  विक्रीसाठी मोकळी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच गणपती विसर्जनासाठी कुठल्याही प्रकारची गर्दी होवू नये यासाठी कुत्रिम तलावांचा वापर करावा असे आवाहन  भुजबळ यांनी यावेळी उपस्थित सर्व गणेशमंडळाच्या प्रतिनिधींना केले.
पाण्याचा अपव्यय टाळा
गणपती विर्सजनानंतरचे मुर्तीचे भग्न अवयवांचे काही छायाचित्रे किंवा चलत छायाचित्रे सोशल मिडीया व प्रसार माध्यमांद्वारे प्रसारण होणार नाही यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक त्या उपायायोजना करुन  मुर्तीच्या भग्न अवयवांचे सन्मानपूर्वक विसर्जन करावे. यंदा पाऊस कमी प्रमाणात झाला असल्याकारणाने पाण्याचा अपव्यय होणार नाही याची सर्व लोकप्रतिनिधी, गणेशमंडळाचे प्रतिनिधी यांनी दक्षता घ्यावी. तसेच गणपती ही मंगलमूर्ती असून आनंद देणारी असल्याने भक्तीभावाने हा उत्सव साजरा करण्याबाबतचे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी केले.
मोकळ्या जागेत स्टॉल
खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, रस्त्यावर स्टॉल न लावता मोकळ्या जागेत लावण्याचे नियोजन करण्यात यावे तसेच प्रभागानुसार कृत्रिम तलाव करण्यात येवून त्यामध्ये गणेशमुर्तीचे विसर्जन करण्याबाबत नियोजन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी बैठकीत मांडल्या. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सरोज अहिरे,  माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, मनपा उपायुक्त प्रदीप चौधरी उपस्थित होते.


Previous Post

सलून व्यावसायिकांचे आज निवेदन

Next Post

अनलॉकमध्ये चाचण्या चारपटीने; बाधित वाढले मात्र दहापटीने 

Next Post

अनलॉकमध्ये चाचण्या चारपटीने; बाधित वाढले मात्र दहापटीने 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’विजेत्याचा बहुमान (व्हिडिओ)

January 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

‘इंडिया दर्पण’मध्ये आता वास्तू शंकासमाधान; दर आठवड्याला या दिवशी

January 29, 2023

डास कानाजवळच का गाणं म्हणतात? संशोधकांना सापडलं इंटरेस्टिंग उत्तर

January 29, 2023

वजन घटवायचंय मग ही कॉफी नक्की प्या!

January 29, 2023

आरोग्यच्या प्रधान सचिवांनी अचानक दिली स्त्री रुग्णालयाला भेट

January 29, 2023

असे झाले बोमन इराणी ‘राजश्री प्रॉडक्शन’चा भाग; अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा

January 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group