नाशिक – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्के भरले आहे. त्यामुळे नाशिकवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे. जिल्ह्यातील भावली, भोजापूर, माणिकपुंज ही तीन धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे तेथून विसर्ग सुरू झाला आहे. जिल्ह्यात एकुण २४ मोठी धरणे असून त्यात १७ मध्य प्रकल्प तर ७ मोठे प्रकल्प आहे. या सर्व धरणांतील पाण्याची क्षमता ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफुट असून आतापर्यंत या सर्व धरणात ४० हजार ५३७ दशलक्ष घनफुट पाणी साठले असून त्याची टक्केवारी ६२ टक्के आहे.
गंगापूर धरणाची पाणी क्षमता ५ हजार ६३० दशलक्ष घनफुट आहे. आतापर्यंत धरणात ४ हजार ५२९ दशलक्ष घनफुट साठा झालेला आहे. गेल्या वर्षी हा साठा ५ हजार ३०४ दशलक्ष घनफुट होता. येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहिल्यास गंगापूर धरण अोव्हरप्लो लवकरच होईल.
सध्या दारणा धरणातून १२ हजार १५८, नांदूरमध्यमेश्वर मधून १९ हजार ४९५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील चिंता मिटली आहे. पिकांना जीवदान मिळाले आहे. तर, आगामी दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा असा
धरण….दलघफू……टक्के
गंगापूर……. ४५२९…… ८०
गौतमी गोदावरी……. ९५६….. ५१
आळंदी….. १८४….. १९
दारणा…… ६४२९…….. ९०
मुकणे ………४४६९……. ६२
भावली ………१४३४……… १००
वालदेवी……. ८९३……… ७९
काश्यपी …..७५५……….४१
पालखेड……… ४३१…….. ६६
चणकापूर ……..१४०२ …….५७.७७
ओझरखेड………. ९१७…….. ४३
नागासाक्या …..३४३……… ८६
करंजवण……… १९००……. ३५