गामपेला (बुर्किना फासो) – कोरोनाच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी जगभरात लस तयार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. काही कंपन्यांच्या लस ही अंतिम टप्प्यात असून त्याबाबत साकारात्म माहिती मिळते आहे. मात्र, असे असले तरी कोरोनाची लस आल्यास काही आव्हान तसेच कायम राहणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जगभरातील सर्व लोक, विशेषत: गरीब आणि विकसनशील देशांमध्ये, लस उपलब्ध होणार हे देखील एक मोठे आव्हानच असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. प्रत्येकाला लस मिळण्यासाठी व ती कायम प्रभावी राहण्यासाठी शीतगृह साखळी (कोल्ड चेन) आवश्यक आहे. जगातील अनेक देशांमध्ये त्याची कमतरता असल्याचे समोर आले आहे. तयार केलेली लस प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी कोल्ड चेनची आवश्यकता असते.
रेफ्रिजरेशन केल्यास लस जास्त काळ टिकते असा दावा काही संस्थांनी केला होता, त्या अनुषंगाने कोल्ड चेन आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे. तेच सर्वात मोठे आव्हान असल्याचे पुढे आले आहे. अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये लस पोहोचण्यास उशीर असल्याचे यावरून दिसते आहे. विकसित देश खास करून जेथे -७० डिग्री सेल्सियस तापमान नियंत्रित करणे कठीण असल्याने सर्वांपुढे हे आव्हान असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.