गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ऑनलाईन उखाणे स्पर्धा; त्वरित व्हिडिओ पाठवा

by India Darpan
सप्टेंबर 4, 2020 | 4:06 pm
in राज्य
0
Mavim 750x375 1

मुंबई – सध्याच्या ‘कोविड-१९’ च्या काळात महिलांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) येणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उखाणे स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठीचे व्हिडिओ येत्या दि. १० सप्टेंबरपर्यंत माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

उखाणा घेणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे असे म्हटलयास वावगे ठरणार नाही. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्या सध्याच्या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी राज्यातील महिलांसाठी महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून ती नि:शुल्क आहे. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी नाविन्यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मूल्य असणारे यापैकी एका उखाण्याचा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडिओ तयार करून माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे दिनांक १० सप्‍टेंबर, २०२० पर्यंत पाठवावा.

स्पर्धेसाठीचे उखाणे नाविन्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा. उखाणे हा मौखिक साहित्यिक प्रकार आहे. तरी या स्पर्धेसाठी त्यातील आशय हा प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा. सर्वसाधाणपणे पतीच्या नावाभोवती उखाणे गुंफले जातात. पण, या स्पर्धेत समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा (विशेषत: स्त्री व्यक्तिरेखा), कोविड काळातील अत्यावश्यक सेवा यांच्यापैकी अथवा यासारखे तत्सम यांच्या भोवती उखाणे गुंफणे अपेक्षित आहे. उखाणा ‘स्त्री पुरुष समानता’ या मूल्यांचा पुरस्कार करणारा असावा. तो कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिट लांबीचा असावा. उखाणा पाठ असावा.

जिल्ह्यात प्राप्त उखाण्याची जिल्हा स्तरावर परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक आणि माविमेतर महिलांचे ३ क्रमांक काढून ६ व्हिडीओ विभागीयस्तरावर पाठविण्यात येतील. प्रति जिल्हा ६ याप्रमाणे साधारण एकूण ३६ पात्र व्हिडीओ एका विभागीयस्तरावर प्राप्त होतील ज्यामधून परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेतर महिलांचे ३ क्रमांक काढून ६ व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. ६ विभागाचे मिळून ३६ पात्र व्हिडीओमधून राज्यस्तरावर केवळ माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेतर महिलांचे ३ असे ६ क्रमांक काढले जातील. मात्र, विभागीय स्तरावर ३६ पात्र महिलांना स्‍पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्‍यात येईल. राज्‍यस्‍तरीय विजेत्या ६  महिलांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्‍यात येईल. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी माविम मुख्यालयाचे कार्यक्रम व्यवस्थापक महेंद्र गमरे (भ्रमणध्वनी क्र.९८९२५४८८५४) यांच्याशी किंवा जिल्हा कार्यालयांशी संपर्क साधावा. महामंडळाचे संकेतस्थळ www.mavimindia.org वर सर्व जिल्हा कार्यालयांचे संपर्क, संबंधित अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक व इमेल उपलब्ध आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनमाड – तीन रिक्षा जाळल्या, रिक्षाची तोडफोड

Next Post

शैक्षणिक प्रश्नांबाबत अभाविपचे पुणे विद्यापीठाला निवेदन

Next Post
IMG 20200903 WA0032

शैक्षणिक प्रश्नांबाबत अभाविपचे पुणे विद्यापीठाला निवेदन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011