एसटीच्या पहिल्या महिला बसचालक माधवी साळवे यांची संघर्षमय यशोगाथा

 

 

नाशिक – कोरोना लॉकडाऊनने अनेकांचे रोजगार गेले, अनेकांवर विविध संकटे आली आहेत. मात्र, आपत्तींवर मात करत संधी शोधून जे धैर्याने पुढे जातात तेच यशस्वी होतात. माधवी साळवे या त्यापैकीच एक आहेत.

टेम्पो चालक, सेल्समन, गृहउद्योग संचालिका आणि आता एसटी चालक अशा विविध प्रकारच्या भूमिका निभावणाऱ्या माधवी साळवे यांचा जीवनप्रवास अतिशय संघर्षमय आहे.

नाशिक जिल्ह्यात ज्या १० महिलांची बस चालक म्हणून निवड झाली आहे त्यात माधवी साळवे यांचाही समावेश आहे. कोरोनामुळे त्यांचे प्रशिक्षण लांबले आहे. लवकरच त्या आता एसटीचे सारथ्य करणार आहेत.

संकटांना न डगमगता विविध प्रकारच्या संधी शोधणाऱ्या आणि अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या माधवी साळवे यांचे यश खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.

पाहू या त्यांची ही यशोगाथा…