शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात ‘महामारी व्यवस्थापन’ची भर  

by India Darpan
ऑगस्ट 25, 2020 | 8:52 am
in राज्य
0
NPIC 2020723193854

भारतीय वैद्यकीय परिषदेचा निर्णय
हर्षल भट, नाशिक
मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत साथीचे आजार आल्यावर सामोरे जाण्याचे तंत्रशुद्ध शिक्षण दिले जाणार आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेने ‘महामारीचे व्यवस्थापन’ हा विषय एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. साथीच्या आजारांचे थैमान अनेक वर्षांपासून सुरु असून त्याला समोरे जाण्यासाठी वैद्यकीय शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याची माहिती होणे अनिवार्य असल्याने भारतीय वैद्यकीय परिषदेने महामारीचे व्यवस्थापन हा विषय अंतर्भूत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.साथीचे आजार आल्यावर त्याला सामोरे कसे जायचे याचं तंत्रशुद्ध, सखोल असे शास्त्रीय शिक्षण आतापर्यंतच्या एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला नव्हता. मात्र यापुढे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना महामारीचे धडे मिळणार आहेत. मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रम शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत पीपीई किटच्या वापरापासून ते महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थापन कशा पद्धतीने हाताळावे याविषयी शिक्षण दिले जाणार आहे.  तसेच फक्त या आजारांवर उपचार न करता सामाजिक व कायदेशीर पद्धतीने हाताळण्यासाठी विद्यार्थी घडवण्याकडे भर दिला जाणार आहे. बोर्ड ऑफ गव्हर्नर्स अर्थात भारतीय वैद्यकीय परिषदेने ‘महामारीचे व्यवस्थापन’ हा विषय ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून यापुढे कोरोनासारखे संकट आल्यास सक्षम विद्यार्थी तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य साथीच्या आजारात काय करावे याचा अभाव असल्याने सखोल वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. केवळ साथरोग आणि औषधवैद्यक शास्त्र विभागातील तज्ज्ञ यांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला होता. विद्यार्थी दशेतच साथीच्या रोगा संबंधी सर्व गोष्टीचे ज्ञान अवगत होण्याच्या दृष्टीने हा सखोल अभ्यासक्रम बनवण्याचा निर्णय बोर्ड ऑफ गव्हर्नर्स-भारतीय वैद्यकीय परिषदेने घेतला आहे. याकरता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या १२ तज्ज्ञांनी अभ्यासक्रम बनवला असून यापुढे तो ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे.

संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना, पीपीई किटचा योग्य वापर करण्याची पद्धत, टेस्टिंग करतेवेळी चाचण्यांचे नमुने घ्यावयाची पद्धत, त्यांचे योग्य संकलन आदी अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. उपचारपद्धती हाताळण्याची प्रणाली, साथीच्या आजाराचे व्यवस्थापन व त्याचे विलगीकरण, अलगीकरण तसेच कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग इत्यादी सर्व विषयांवरील अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. प्रामुख्याने या अभ्यासक्रमात चिकित्सालयीन औषधशास्र, सूक्ष्मजीवशास्र, जनऔषध वैद्यकशास्र, श्वसनविकार यासंबंधी शिक्षक व विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध हटवा; भाजपा उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

गौरी गणपती निमित्त आज सायंकाळी भजनसंध्या; फेसबुक लाईव्हद्वारे आयोजन

Next Post
IMG 20200825 WA0006

गौरी गणपती निमित्त आज सायंकाळी भजनसंध्या; फेसबुक लाईव्हद्वारे आयोजन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011